कृषी

Sugarcane Farming: ऊस शेतीतून कमवायचेत ना लाखों…! मग ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या पाकोळी किडीचे असे करा व्यवस्थापन, ‘ही’ फवारणी घ्या

Published by
Ajay Patil

Sugarcane Farming: भारतात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन (Sugarcane Production) घेतले जाते. ऊस उत्पादनात भारत जगात दुसर्‍या स्थानावर विराजमान आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून भारताच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

गत हंगामात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करून साखर उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला होता. यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचात निश्चितच एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) सर्व अर्थकारण या नगदी पिकावर (Cash crop) अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधव ऊस पिकाच्या (Sugarcane Crop) व्यवस्थापनाकडे नेहमीच बारीक लक्ष ठेवून असतो. आज आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी ऊस पीक व्यवस्थापनातील (Sugarcane Crop Management) काही महत्त्वाच्या बाबी घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो खरे पाहता ऊस या नगदी पिकावर पाकोळी या किडीचे मोठ्या प्रमाणात सावट असते. पाकोळी या कीटकांमुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि उसाच्या उत्पादनात लक्षणीय घट होते. अशा परिस्थितीत वेळीच ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या पाकोळी किडीचे व्यवस्थापन (Sugarcane Pest Control) करावे लागते.

म्हणून आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या पाकोळी किडीचे कशा पद्धतीने व्यवस्थापन किंवा नियंत्रण केले जाऊ शकते याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या पाकोळी किडीचे नियंत्रण किंवा व्यवस्थापन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, सध्या ऊस पिकावर पाकोळी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव नजरेस पडत आहे. पायरीला किंवा पाकोळी कीटकाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी बांधव जैविक तसेच रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवू शकतात. जैविक पद्धतीने या कीटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी 5% निंबोळी अर्क  किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. शेतकरी बांधवांनी ऊस पिकावर फवारणी करताना पावसाची उघडीप बघून तसेच वाफसा कंडिशनमध्ये फवारणी करावी असे तज्ञांचे मत आहे.

पाकोळी कीटकाचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण तसेच व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी बांधवांनी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना शेतकरी बांधवांनी पावसाची उघडीप बघावी. तसेच वापसा कंडिशन मध्ये फवारणी करण्याचा सल्ला जाणकार लोक देत असतात.

शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे. येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil