Syngenta New Fungicide : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर भारताला शेतीप्रधान देशाचा टॅग मिळाला आहे. देशाची जवळपास 50% जनसंख्या ही शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. हेच कारण आहे की कृषी क्षेत्राला बळकटी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत.
यासाठी देशभरातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अविष्कार केला जात आहे. वेगवेगळ्या पिकांचे नवीन वाण विकसित केले जात आहेत. यासोबतच काही खाजगी कंपन्या देखील सातत्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान अशाच एका खाजगी कंपनीने देशातील शेतकऱ्यांसाठी दोन नवीन बुरशीनाशक लॉन्च केले आहेत. सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नुकतेच दोन बुरशीनाशक लॉन्च केले असून आज आपण याच दोन बुरशीनाशकासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लॉन्च केलेले हे बुरशीनाशक कोणत्या पिकांसाठी शिफारशीत करण्यात आले आहेत आणि याचा काय लाभ होणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नव्याने लॉन्च झालेले बुरशीनाशक कोणते ?
रिफ्लेक्ट टॉप : सिजेंटा कंपनीने विकसित केलेले पहिले बुरशीनाशक म्हणजे रिफ्लेक्ट टॉप. हे बुरशीनाशक फक्त भात म्हणजेच धान पिकासाठी आहे. याचा वापर फक्त धान पिकासाठीच होणार आहे.
कंपनीने असा दावा केला आहे की नव्याने लॉन्च झालेले हे धान पिकासाठीचे बुरशीनाशक पिकावर येणाऱ्या शीथ ब्लाइट या रोगामध्ये खूपच प्रभावी आढळले आहे.
या बुरशीनाशकामुळे या रोगाचा नायनाट करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना या बुरशीनाशकाचा फायदा होणार आहे.
मिराव्हिस ड्युओ : सिजेंटा कंपनीने लॉन्च केलेले दुसरे बुरशीनाशक म्हणजे मिराव्हिस ड्युओ. मात्र कंपनीचे हे बुरशीनाशक फक्त एकाच पिकासाठी राहणार नाही. या फंगीसाईडचा वेगवेगळ्या पिकांसाठी वापर करता येणार आहे.
द्राक्ष मिरची भुईमूग टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये याचा वापर करता येणार आहे. हे बुरशीनाशक पिकांवर येणाऱ्या भुरी, करपां, पानांवरील ठिपके यांसारख्या रोगांवर नियंत्रण मिळवून देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
नक्कीच यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तथापि, सिजेंटा कंपनीने लॉन्च केलेल्या या बुरशीनाशकांना शेतकऱ्यांकडून कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.