अल निनोचा पिकावर परिणाम ! कापसाचे गेल्या १५ वर्षांतील कमी उत्पादन होण्याचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agricultural News : अल निनोच्या प्रभावामुळे देशात कमी पेरणी झाल्याचा विपरीत परिणाम कापूस पिकावर होणार आहे. देशातील कापूस उत्पादन २०२३-२४ च्या विपणन हंगामात २ कोटी ९५.१ लाख गाठी राहण्याचा अंदाज आहे,

गेल्या १५ वर्षांतील हे सर्वात कमी उत्पादन असेल, असे भारतीय कापूस महामंडळाने म्हटले आहे. कापूस विक्रीचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होऊन सप्टेंबरपर्यंत चालतो. कापसाच्या एका गाठीचे वजन १७० किलो असते.

गेल्या वर्षातल्या विपणन हंगामातील ३ कोटी १८.९ लाख गाठींपेक्षा विपणन हंगाम २०२३ २४ साठी कापूस उत्पादन अंदाज हा ७.४९ टक्के कमी आहे. हा २०२३-२४ विपणन हंगामामध्ये ३ कोटी १६.५ लाख गाठींच्या सरकारी उत्पादनाच्या अंदाजापेक्षा कमी आहे.

२००८-०९ च्या विपणन हंगामानंतरचे हे सर्वात कमी भारतीय कापूस उत्पादन असेल, असे महामंडळाने आपला पहिला अंदाज जाहीर करताना म्हटले आहे.कपाशीचे एकूण पेरणी क्षेत्र ५.५ टक्क्यांनी घटले असून अल निनोमुळे आलेल्या प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.

१ ऑक्टोबर रोजी सुरुवातीचा साठा २८.९ लाख गाठींचा अंदाज आहे, तर २०२३ २४ हंगामात कापसाची आयात २२ लाख गाठी आणि निर्यात १४ लाख गाठी होईल, असा अंदाज महामंडळाने व्यक्त केला आहे. या वर्षात देशांतर्गत कापसाची मागणी ३.११ कोटी गाठी असण्याचा अंदाज महामंडळाने व्यक्त केला आहे.

साखर उत्पादन नऊ टक्क्यांनी घटण्याची शक्यता

नवी दिल्ली: इस्मा या साखर उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या संस्थेने चालू विपणन हंगामासाठी एकूण साखर उत्पादन नऊ टक्क्यांनी घसरून ३३७ लाख टनांवर येण्याचा अंदाज व्यक्त केला असून, हे उत्पादन देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे असेल.

साखर विपणन वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होते आणि सप्टेंबरपर्यंत चालते. ऑगस्टमध्ये एकूण साखर उत्पादन ३६९ लाख टन असल्याचा अंदाज इंडियन शुगर मिल असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला होता, तर इथेनॉलसाठी ४१ लाख टन पाठवल्यानंतर निव्वळ साखरेचे उत्पादन ३२८ लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

देशातील साखरेचा सरासरी घरगुती वापर २७८.५ लाख टन एवढा आहे, हे लक्षात घेता हे उत्पादन साखरेची पुरेशी उपलब्धता असल्याचे संस्थेने म्हटले आहे. देशात उसाचे एकूण क्षेत्र सुमारे ५७ लाख हेक्टर असल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षाच्या विपणन वर्षात ६१ लाख टन साखरेची निर्यात केली होती. या पणन वर्षासाठी सरकारने अद्याप निर्यात परवानगी दिलेली नाही.

उत्पन्नाचा अंदाज असा

■गुजरात ८५ लाख गाठी, महाराष्ट्र ७६ लाख गाठी, तेलंगणा ३० लाख गाठी, कर्नाटक १८.५ लाख गाठी, मध्य प्रदेश १८ लाख गाठी, हरयाणा 16 लाख गाठी