कृषी

याला म्हणतात यश! पशुपालन व्यवसाय जातं होता तोट्यात मात्र, शेणखत विक्रीतून झाला लखपती; आता 110 गाईंचा गोठा अन 14 लोकांना रोजगार

Published by
Ahmednagarlive24 Office

succes story : देशात मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) केला जातो. पशुपालन व्यवसायात सर्वाधिक गाईंचे पालन (Cow Rearing) आपल्या देशात केले जात असते. पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) पशुपालन मुख्यतः दुग्धोत्पादनासाठी (Milk Production) तसेच शेणखतासाठी करत असतात.

पशुपालन व्यवसाय पशुपालक शेतकऱ्यांना फायदेशीर देखील सिद्ध होतं आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) एका शेतकर्ऱ्याला देखील पशुपालन व्यवसाय फायदेशीर ठरला असून या व्यवसायातून त्याने लाखो रुपयांची कमाई केली आहे.

प्रेम आर्य या पशुपालक शेतकऱ्याने शेण विकून 18 लाखांपेक्षा जास्त कमाई करण्याची किमया साधली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, छत्तीसगड सरकारने छत्तीसगड राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना स्वावलंबी बनण्यासाठी तसेच त्यांना वित्तीय आधार मिळावा यासाठी गोधन न्याय योजना सुरू केली आहे.

ही योजना छत्तीसगड सरकारने सर्वस्वी राज्याच्या खर्चाने सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत छत्तीसगड सरकार गाय पालकांकडून शेणखत खरेदी केले जाते. छत्तीसगड सरकारच्या या योजनेचा प्रेम आर्य यांना देखील मोठा फायदा झाला आहे.

कृषी विभागाकडून सार्वजनिक करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही योजना सुरू झाल्यापासून 20 जुलै 2020 पर्यंत प्रेम आर्य यांनी 18 लाख 15 हजार 380 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शेणाची विक्री केली आहे. सध्या संपूर्ण देशात छत्तीसगड हे एकमेव राज्य आहे जिथे सरकार 2 रुपये किलो दराने शेणखत खरेदी करत आहे.

मुंगेली येथील शंकर मंदिर येथे राहणारे प्रेम आर्य यांनी सांगितले की, त्यांनी 8 गायी विकत घेऊन 2016 मध्ये पशु पालन करण्यास सुरुवात केली. खरं पाहता प्रेम आर्य हे व्यवसायाने जनरल स्टोअरचे मालक आहेत.

गायींवर असलेल्या प्रेमामुळे त्यांनी एक छोटी डेअरी सुरू केली. पशुपालन व्यवसाय सुरू केल्यानंतर थोड्याच काळात त्यांनी आणखी 7 गायी विकत घेतल्या. मात्र काही काळानंतर त्यांनी सुरू केलेला व्यवसाय तोट्यात जाऊ लागला.

दुग्ध व्यवसाय बंद करावा लागेल असे त्यांना वाटू लागले. प्रेम सांगतात की, जेव्हा छत्तीसगडमध्ये शेणखत खरेदी सुरू झाली तेव्हा त्यांना ही योजना खूप आवडली. प्रेमने सांगितले की, 15 गायीचे संगोपन करून दुग्धव्यवसाय चालवत होते, पण या पासून त्यांना मिळकत होत नव्हती यामुळे हा व्यवसाय तोट्यात जातं होता.

मात्र शासनाच्या या शेणखत खरेदीच्या योजनेमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. आज प्रेम यांच्याकडे 110 गायी आहेत. प्रेम मुबलक शेण जमा झाल्यानंतर, जवळपास दररोज एक ट्रॅक्टर ट्रॉली भरून शेण विक्रीसाठी पाठवतो.

ही योजना कधीचं बंद व्हायला नको
प्रेम आर्य यांनी सांगितले की, शासनाच्या गोधन योजनेअंतर्गत शेणखत खरेदीमुळे पशूपालन व्यवसायाला बूस्टर डोस मिळाला आहे. ही योजना कधीचं थांबू नये अशी त्यांची इच्छा आहे. प्रेम आणि त्यांचे कुटुंब गायींच्या सेवेत तत्पर आहेत.

या साठी ते खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या मते, सन 2024 मध्ये 500 गायीपर्यंत हा व्यवसाय वाढवायचा आहे. प्रेम सांगतात की गायीची सेवा करत आहे आणि यासाठी भाग्य लागते. शेणखत खरेदीमुळे दरमहा 35 ते 40 हजार रुपयांची बचत होत असल्याचे प्रेम यांनी नमूद केले.

अशा प्रकारे घेतली जाते गायींची देखभाल
प्रेमने सांगितले की, या गायींचे शेण साफ करण्यासाठी आणि दुग्धशाळा सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे 14 कर्मचाऱ्यांची टीम आहे. दररोज साडेचार क्विंटल चारा वापरला जातो, रायपूरहून 10 पोती धान्य मागवले जाते, एक डॉक्टरही नेमला आहे.

दरमहा 20 ते 25 हजारांची औषधेही गुरांसाठी उपलब्ध केली जातात. गाईंना उष्णता लागू नये म्हणून डेअरीत सुमारे 16 कुलर ठेवण्यात आले आहेत. निश्चितच प्रेम यांनी पशुपालन व्यवसायात चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांना शासनाच्या योजनेचा देखील मोठा लाभ मिळाला आहे.

Ahmednagarlive24 Office