कृषी

राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले ! शेतकरी संघटना फोडून….

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आजचे साखरेचे व इथेनॉलचे दर बघता पाच हजार रुपये प्रति टन दर कसा देता येत नाही, याबाबत कारखानदारांनी व सरकारने समोरासमोर बसून चर्चा करावी. राज्यकत्यांनी शेतकरी लुटण्यासाठी स्व. शरद जोशींची शेतकरी संघटना फोडून खोत,

पाशा पटेल, शेट्टी यांच्यासारख्या नेत्यांना पद, प्रतिष्ठाचे प्रलोभन देऊन शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.

नेवासा येथे दोन काल मंगळवारी अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस परिषद उत्साहात पार पडली. त्यावेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, राज्यकर्त्यांच्या नादानपणामुळे शेतकरी प्रश्न टिकट होत चालले आहे.

परिणामी, सिलोन व बीडची पुनरावृत्तीची वाट राज्यकर्त्यांनी पाहू नये. सिलोन व बीडमध्ये राज्यकत्यांची घरे जनतेने जाळली. शेतकऱ्यांनी ज्यांच्या खांद्यावर माना टाकल्या, त्यांनीच शेतकऱ्यांच्या माना कापण्याचे कामे केली.

त्यामुळे चार मडकी फुटली म्हणून कुंभार रडत बसत नाही, नव्या जोमाने 40 मडके कुंभार तयार करतो. तसे नव्या जोमाने शेतकरी चळवळ वाढवण्याचे काम आम्ही करत आहोत.

कांद्यासारख्या पिकावर कॉंग्रेसने सातशे रुपये प्रति कि टल निर्यात मूल्य लावले होते. परंतु मोदी सरकारने त्यावर कळस करून आठशे रुपये प्रति क्विटल निर्यात मूल्य लावून कांद्याचे भाव वाढण्याचे काम केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. अजित काळे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे होत असलेली ऊस परिषद राज्याला दिशा देण्याचे काम करणार आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे एक टन उसाचे साखरेचे उपपदार्थाचे सात हजार दोनशे रुपये प्रति टन होतात.

तर शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्यास काय अडचण आहे. हवाई अंतराच्या अटीमुळे साखर कारखानदारी मध्ये ठराविक कुटुंबांची मक्तेदारी झाली आहे. बारा वर्षांपूर्वी सोयाबीनचे असलेले दर आजही तेच आहेत.

Ahmednagarlive24 Office