कृषी

सांगलीच्या तरुणाला रताळ्याने केले मालामाल! 60 गुंठ्यात लागवड केलेल्या रताळ्या पासून मिळाले साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न

Published by
Ajay Patil

शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक शेतकरी आपल्याला दिसून येतात. या प्रयोगांमध्ये अनेक प्रकारच्या पिकांची लागवड किंवा पिकाच्या व्यवस्थापनाच्या पद्धती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयोग खूप महत्त्वाचे ठरत असतात. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्तीत असलेला प्रयोगशीलता हा गुणधर्म खूप महत्त्वाचा असतो व तो तसा शेती क्षेत्रामध्ये देखील महत्त्वाचा असतो.

याच पद्धतीने जर आपण  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या बोरगाव येथील रामराव पाटील या तरुण शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर या तरुणाने देखील इंजिनिअरिंग पूर्ण करून खाजगी कंपनीत तो नोकरी देखील करतो.

महत्त्वाचे म्हणजे या तरुणामध्ये प्रयोगशीलता हा महत्त्वाचा गुण असल्याने व त्याला शेतीत आवड असल्याने तो शेतामध्ये देखील वेगवेगळे प्रयोग करत असतो. अगदी याच पद्धतीचा प्रयोग रताळे लागवड करण्याच्या अनुषंगाने करून पाहिला. साठ गुंठे क्षेत्रात  त्याने रताळ्याची लागवड केली व याच रताळ्याने त्याला आज लखपती बनवलेले आहे.

 साठ गुंठे रताळ्याची लागवड करून मिळवले साडेसहा लाखांचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या बोरगाव या गावचे रहिवासी असलेले रामराव पाटील या तरुण शेतकऱ्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले आहे व तो एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. परंतु या तरुणाने नोकरी करत असताना शेतीची आवड देखील जपली व या शेतीमध्ये देखील वेगवेगळे प्रयोग तो करत असतो.

शेतीमध्ये मातीचे आरोग्य उत्तम राहणे हे खूप महत्त्वाचे असते व याकरिता रामराव पाटील हे पीक फेरपालट करण्यावर मोठा भर देतात. त्यामुळे ते शेतात भुईमूग तसेच सोयाबीन व रताळे पिकांचे प्रयोग करत असतात.

यामागे जमिनीचा पोत सुधारावा आणि शेतीचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता अशा वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीचे प्रयोग ते करतात. याच प्रयोगांचा भाग म्हणून यावर्षी मे महिन्यात 60 गुंठे क्षेत्रात त्यांनी रताळे लागवड करण्याचे ठरवले रताळ्याची लागवड देखील केली.

ऑगस्ट महिन्यात या रताळ्याची काढणी करण्यात आली व त्यांना जवळपास नऊ ते दहा टन उत्पादन मिळाले. या रताळे लागवडीतून त्यांना साडेसहा लाख रुपयांचा फायदा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 अशाप्रकारे केले रताळ्या पिकाचे व्यवस्थापन

जेव्हा रामराव पाटील यांनी रताळे लागवड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मे महिन्यामध्ये 60 गुंठे शेतात लागवड करायचे ठरवले. शेतामध्ये आधी उसाचे पीक होते व त्यामुळे त्यांनी उसाचे पीक काढून शेतीची उत्तम मशागत केली व रोटर मारून शेतामध्ये तीन फुटाची सरी घेतली. या सरीमध्ये रताळे लागवड केली व पंधरा दिवसांनी पहिली आळवणी केली.

आवश्यकतेनुसार कीटकनाशकाची एक फवारणी करून पिकाला वाकुरे पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करत राहिले. रताळे हे पीक मुळात तीन महिन्याचे असल्याने ऑगस्ट महिन्यात ट्रॅक्टर आणि मजुरांच्या साह्याने त्यांनी रताळ्याची काढणी सुरू केली व त्यांना 60 गुंठ्यात नऊ टन उत्पादन मिळाले.

हे सगळे रताळे त्यांनी मुंबई येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले. कारण रताळे विक्रीकरिता मुंबई बाजारपेठ ही एक चांगले असून त्या ठिकाणी त्यांना टनाला  72 हजार रुपये इतका भाव मिळाला. त्यामुळे त्यांना  60 गुंठ्यात साडेसहा लाखांचे उत्पन्न या रताळ्याने दिले.

Ajay Patil