कृषी

कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर यांनी विकसित केलेल्या ‘या’ 2 जाती देतील लसणाचे भरघोस उत्पादन! हेक्टरी मिळेल 14 ते 17 टन उत्पादन

Published by
Ajay Patil

Variety Of Garlic Crop:- लसुन हे एक महत्त्वाचे पीक असून जवळपास सर्वच घरांमध्ये लसणाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे एक मसाला पीक म्हणून गणले जाते. भारतामध्ये काही राज्यांमध्ये लसणाची लागवड प्रामुख्याने केली जाते व त्यामध्ये गुजरात तसेच मध्य प्रदेश या राज्याचा समावेश करता येईल.

महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात देखील लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली असून साधारणपणे धुळे तसेच अहिल्यानगर, पुणे, नासिक जळगाव इत्यादी जिल्हे लसूण पिकवणारे जिल्हे म्हणून ओळखले जातात.

सध्या जर लसणाचे दर पाहिले तर ते गगनाला पोहोचले असून येणाऱ्या कालावधीत महाराष्ट्र देखील लसणाच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये जरी लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर आता होत असली तरी देखील मात्र सरासरी हेक्टरी उत्पादन हे खूपच कमी असल्यामुळे त्यामध्ये वाढ होणे खूप गरजेचे आहे.

याकरिता लसणाच्या लागवडीकरिता दर्जेदार आणि अधिक उत्पादनक्षम जातींची लागवड करणे हे तितकेच आवश्यक आहे. लसणाच्या तसे पाहायला गेल्या तर भरपूर जाती लागवडीकरिता उपलब्ध आहेत.

परंतु त्यामध्ये कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर यांच्या माध्यमातून भरघोस उत्पादन देऊ शकतील व दर्जेदार लसणाचे उत्पादन मिळेल या अनुषंगाने दोन जाती विकसित करण्यात आलेले आहेत. प्रति हेक्टर 14 ते सतरा टणापर्यंत उत्पादन देण्यास या जाती सक्षम आहेत.

या आहेत लसणाच्या भरघोस आणि दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जाती

1- भीमा पर्पल- कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर यांनी विकसित केलेली भीमा पर्पल ही जात एन्गुल, ओडीसा येथून गोळा करण्यात आलेल्या लसणातून निवड पद्धतीने विकसित केलेली जात आहे. लसणाचा हा वाण जास्त उत्पादन देणारा असून याचे गड्डे हे मध्यम आकाराचे, घट्ट आणि पांढऱ्या रंगाचे असतात.

एक गड्ड्यातील पाकळ्यांची संख्या पाहिली तर ती साधारणपणे 16 ते 20 असून त्यांचा रंग जांभळसर पांढरा असतो.भीमा पर्पल वाणाची लागवड केल्यापासून साधारणपणे 135 ते 150 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो. या वाणाच्या लागवडीपासून हेक्‍टरी 17 टन पर्यंत उत्पादन मिळू शकते.

2- भीमा ओमकार- ही जात नालंदा बिहार या भागातून गोळा केलेल्या लसणामधून कांदा व लसूण संचालनालयाने निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. भीमा ओमकार या जातीच्या लसणाचा गड्डा( कंद )मध्यम आकाराचा, घट्ट आणि पांढऱ्या रंगाचा असतो. साधारणपणे एका कंदामध्ये 18 ते 20 लसणाच्या पाकळ्या मिळतात व त्या पांढऱ्या रंगाच्या असतात.

भीमा ओमकार या लसणाच्या वाणाची लागवड केल्यापासून साधारणपणे 120 ते 135 दिवसात काढणीस तयार होतो. या जातीपासून साधारणपणे हेक्‍टरी 14 टना पर्यंत उत्पादन मिळते. भीमा ओमकार या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लसूण पिकाच्या पानांवर जो काही रोग येतो त्याला हा वाण प्रतिकारक्षम आहे.

Ajay Patil