कृषी

Farmer Success Story : या शेतकऱ्याने थेट इस्रायलवरून आणले बाजरीचे बियाणे ! कणीस आले चक्क 5 फुटाचे, वाचा या बियाण्याची माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Farmer Success Story :-जागतिक पातळीवर कृषी क्षेत्राच्या बाबतीत इस्त्राईल हे नाव खूप प्रसिद्ध आहे. वास्तविक पाहता या देशाचा विचार केला तर बहुसंख्य भाग हा वाळवंटी आहे.

परंतु तरी देखील कृषी क्षेत्रामध्ये या देशाने उल्लेखनीय अशी प्रगती केलेली आहे. अनेक कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान या देशाने विकसित केलेली असून याच तंत्रज्ञानाचा वापर जगातील अन्य देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो व याला भारत देखील अपवाद नाही.

कृषी क्षेत्रामध्ये कायमच वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग या ठिकाणचे शेतकरी करत असतात.सध्या इसराइल आणि हमास या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तणावपूर्ण आहे. परंतु या सगळ्या विपरीत अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्या भारताच्या एका शेतकऱ्याने इस्रायल वरून बाजरीची बियाणे मागवले व त्याची लागवड केली.

साधारणपणे हा शेतकरी गेल्या तीन वर्षापासून त्या ठिकाणच्या बाजरीच्या बियाण्याची लागवड करत असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील घेत आहे. हा शेतकरी मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील अलीगड येथील आहे. या शेतकऱ्याचेच आपण यशोगाथा बघणार आहोत.

अलीगडच्या शेतकऱ्याने इस्रायलवरून मागवले बाजरीचे बियाणे

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील अलीगड येथील एका शेतकऱ्याने इस्रायल मधून मोठे कणीस असलेल्या बाजरीची बियाणे मागवले व गेल्या तीन वर्षापासून हा शेतकरी याच बियाण्याचा वापर करून बाजरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहे.

अलिगड जिल्ह्यातील रुस्तमपुर या गावचे शेतकरी असून त्यांचे नाव लव शर्मा असे आहे. इस्रायल मधून गेल्या तीन वर्षापासून ते मोठे कणीस असलेल्या बाजरीची बियाणे मागवतात व त्याचे उत्पादन घेतात. एक दोन एकर नाहीतर सुरुवातीपासून ते चक्क 23 एकर क्षेत्रामध्ये या बाजरीच्या बियाण्याची पेरणी करतात व एकरी भरघोस असे बाजरीचे उत्पादन घेत आहेत.

याबाबत बोलताना लव शर्मा म्हणतात की भारत आणि इसराइल या दोन्ही देशातील शेतीच्या उत्पादन खर्चात मोठा फरक नाही. इस्रायलचे मोठ्या कणसाचे बाजरी बियाणे वापरून ते अधिकचा नफा मिळवत आहेत.

केंद्र सरकारकडून मिळत आहे प्रोत्साहन

अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्याच्या बाबतीत केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांना विविध प्रयत्नातून प्रोत्साहित करत आहेत व याचाच भाग म्हणून 31 ऑक्टोबर रोजी क्वारसी कृषी फार्म या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मिलेट्स महोत्सवांमध्ये लव शर्मा देखील सहभागी झालेले होते.

त्यामुळे या महोत्सवामध्ये लव शर्मा यांनी या बियाण्याबाबत इतर शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की बाजरीच्या देशी बियाण्यापासून जे काही बाजरी उत्पादित होते त्या पिकाला केवळ एक फूट एवढ्या लांबीचे कणीस मिळते. परंतु इस्राईलच्या या बाजरीच्या बियाण्यापासून जवळपास पाच फूट लांब असलेले कणीस मिळते. एवढे मोठे कणीस असल्यामुळे नक्कीच बाजरीच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होते असे देखील त्यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office