कृषी

700 किलो दराने विकल्या जाणाऱ्या लाख लागवडीतून ‘हा’ शेतकरी कमवतो लाखो रुपये! मिळाले राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार; वाचा यशोगाथा

Published by
Ajay Patil

Farmer Success Story:- आजकाल शेतकरी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेतात व यामध्ये बाजारपेठेची मागणी व त्यानुसार केलेली लागवड ही खूप फायद्याची ठरताना दिसून येते. भारतामध्ये आता शेतकरी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेऊन स्वतः सोबत इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देऊन त्यांचे देखील उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करताना आपल्याला दिसून येत आहेत.

अगदी याच पद्धतीने जर आपण छत्तीसगड राज्यातील महासंघ जिल्ह्यात असलेले प्रगतिशील शेतकरी मिलन सिंग विश्वकर्मा यांची यशोगाथा बघितली तर या शेतकऱ्याने लाख लागवडीतून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली असून जवळपास 22 वर्षे शेती क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले यांनी लाख उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.

त्यामुळे त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले असून दरवर्षी लाखोत नफा माध्यमातून ते मिळवत आहेत. त्यांनी लाख शेतीमध्ये वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केल्यामुळे त्यांच्यासाठी हा एक फायदेशीर व्यवसाय ठरला आहे.

मिलनसिंग कसे वळले लाख शेतीकडे?
यांचे जर जीवन पाहिले तर ते एक संघर्षाने भरलेले असून आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी फक्त बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यामुळे नोकरीचा कुठलाही चान्स नसल्याने त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. अगदी सुरुवातीला ते शेतीमध्ये भात व इतर पारंपारिक पिकांची लागवड करत होते.

या पिकांसाठी घ्यावे लागणारे कष्ट व टाकावा लागणारा पैसा व त्यातून मिळणारे उत्पादन यांचा कुठलाच ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करावे अशा उद्देशाने त्यांनी लाख शेतीची निवड केली.

अशाप्रकारे त्यांनी 2002 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल रेजीन्स अँड गम्स,रांची येथील कृषी शास्त्रज्ञांनी त्यांच्या जिल्ह्याला भेट दिली होती व जुन्या पद्धती ऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करून लाखाची शेती केल्यास उत्पादन आणि नफा अनेक पटींनी वाढू शकतो हे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

त्यानंतर मिलन सिंग यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे ठरवले व त्यामुळे त्यांचे उत्पन्न दहा पटीने वाढले. आज त्यांनी 26 एकर जमिनीवर लाखाची लागवड केली असून यासोबतच ते इतर पिके देखील घेतात. इतर पिकांमध्ये भाजीपाला तसेच कडधान्य आणि तेलबिया वर्गीय पिकांचा ते समावेश करतात. त्यांनी लाखाच्या कुसुमी आणि रांगणी लाख अशा दोन प्रमुख जातींची लागवड केलेली आहे.

लाख उत्पादन आणि मिळणारा बाजार भाव
मिलन सिंग यांच्या मते जर बघितले तर लाख शेतीसाठी आदर्श तापमान हे 17 ते 36 अंश सेल्सिअस आहे व या तापमानामध्ये लाख उत्पादन चांगले येते. त्यामध्ये रांगणी जातीच्या लाखापासून आठ ते वीस क्विंटल प्रति एकर तर कुसुमी लाख जातीपासून सहा ते दहा क्विंटल प्रति एकर इतके उत्पादन मिळते.

जर बाजारपेठेत लाखाचा भाव बघितला तर सातशे रुपये किलोच्या आसपास असून थेट बांधावर लाखाची खरेदी करण्यासाठी व्यापारी येतात. त्यामुळे वाहतूक खर्च वाचून शेतकऱ्यांना अतिरिक्त नफा मिळतो.

लाख शेती शेतकऱ्यांसाठी कशी आहे फायद्याची?
लाख शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेस.परंतु पर्यावरणासाठी देखील फायदेशीर असल्याचे मिलन सिंग स्पष्ट करतात. लाखापासून अनेक उत्पादने तयार केली जातात व विविध उद्योगांमध्ये देखील वापरले जातात.

प्रामुख्याने कृत्रिम दागिने तसेच पॅटर्न कॉम्बिनिंग, इतर सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी लाखाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्याशिवाय गोंद आणि टेप आणि इतर राळ आधारित उत्पादने देखील लाखापासून तयार केली जातात.

बाजारपेठेमध्ये लाखाची मागणी सतत वाढत आहे व या शेतीतून शेतकरी जीवनात आर्थिक प्रगती करू शकतात.तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून लाख शेती फायदेशीर असून जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास देखील मदत मिळते.

लाख शेतीत कुठल्या येऊ शकतात समस्या?
लाखाच्या शेतीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर या पिकावर कीड आणि बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व पावसाळ्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

याकरिता मिलन सिंग शास्त्रज्ञांचा सल्ला घेतात व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकारच्या समस्यांवर मात करतात. शेतीमध्ये सेंद्रिय उपचाराचा वापर करून पिकाचे कीटक आणि बुरशीपासून संरक्षण करतात. मिलन सिंग यांच्या मते जर शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्या तर लाखाच्या शेतीतून जास्तीत जास्त नफा मिळू शकतो.

Ajay Patil