कृषी

नाशिक जिल्ह्यातील ‘हा’ शेतकरी आले लागवडीतून घेतो लाखोत उत्पन्न! यावर्षी 5 एकर आले लागवडीतून आहे 50 ते 60 लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा विश्वास

Published by
Ajay Patil

Ginger Farming:- आताची शेती पद्धत ही पारंपरिक राहिली नसून तिला आता आधुनिक पद्धतीची किनार लाभली आहे आणि मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या व्यवसायिक पिकांची लागवड आता शेतीत होऊ लागल्यामुळे शेती क्षेत्राचा फार चेहरा मोहरा बदलायला त्यामुळे मदत झाली आहे.

परंतु त्यामुळे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रगती करताना दिसून येत आहेत. अलीकडच्या कालावधीपासून बघितले तर पारंपारिक पिकांना तिलांजली देत शेतकरी आता विविध प्रकारचे फळबागा, भाजीपाला पिकांच्या लागवड आणि मसाले वर्गीय पिके यांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत असून त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी साधत आहे.

याच मुद्द्याला धरुन जर आपण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील गवंडगाव येथील प्रगतीशील शेतकरी दामू भागवत यांची जर यशोगाथा बघितली तर त्यांनी आले लागवडीतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे.

आले लागवडीतुन या शेतकऱ्याने सध्या आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निसर्गाचा लहरीपणा सातत्याने होणारा हवामान बदल सगळ्या गोष्टींचा परिणाम शेतीवर होत असून शेतीपुढे मोठे आव्हान निर्माण केलेले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून आधुनिक पद्धतीची शेती करू लागले आहेत.

याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या गवंडगाव येथील प्रगतिशील शेतकरी दामू भागवत यांनी आले लागवडीचा प्रयोग यशस्वी केला असून पारंपरिक शेतीला सोडून त्यांनी आधुनिक शेतिची पद्धत अवलंबली व आले लागवडीचा निर्णय घेतला.

त्यांनी साधारणपणे चार वर्षांपूर्वी एक एकर शेतीमध्ये आल्याची लागवड केली व त्यातून चांगले उत्पादन मिळवत नफा देखील चांगला मिळवला होता व त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला व त्यांनी आले लागवड क्षेत्रामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे त्यांनी मागील वर्षी 11 एकर शेतीमध्ये अद्रक लागवड केली होती. परंतु मागच्या वर्षी साधारणपणे संपूर्ण राज्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती व तशीच परिस्थिती येवला तालुक्यात देखील असल्यामुळे त्याचा काही प्रमाणात फटका दामू भागवत यांना देखील बसला होता.

तरी देखील त्यांनी अकरा एकरमध्ये 80 लाखाचे उत्पन्न मिळवून एक विक्रमच प्रस्थापित केला होता.खर्चाच्या मानाने मागच्या वर्षी कमी उत्पन्न मिळाले व त्यामुळे निराश न होता यावर्षी पुन्हा नव्या उमेदीने त्यांनी आले लागवडीचा निर्णय घेतला व पाच एकरात पुन्हा अद्रक लागवड केली आहे.

ठिबक सिंचनावर ही लागवड केली असून यावेळेस पाच एकरात एक हजार क्विंटल आल्याचे उत्पादन निघून त्या माध्यमातून 50 ते 60 लाखाचे उत्पन्न मिळेल असा विश्वास त्यांना आहे.

अशा पद्धतीने पारंपारिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती करत योग्य व्यवस्थापनाने जर आपण शेतीमध्ये नियोजन केले तर नक्कीच आपण लाखोत उत्पन्न मिळवू शकतो हे भागवत यांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.

Ajay Patil