कृषी

Farmer Success Story: शेतीमध्ये 25 हजार रुपयांचा खर्च करून या शेतकऱ्याने 6 लाख रुपये कमावले! कसे केले शक्य? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Farmer Success Story:- सध्या कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमीत कमी कालावधीत आणि कमीत कमी क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेतात व चांगला पैसा मिळवतात.

तसेच शेतीमध्ये बरेच शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात व त्यांच्या या प्रयोगशीलतेच्या गुणामुळे वेगवेगळ्या पिकांचा अवलंब करून देखील कमीत कमी क्षेत्रात व कमीत कमी खर्चात लाखोत उत्पादन मिळवण्यात यशस्वी होतात.

अगदी याच पद्धतीने जर आपण  उत्तर प्रदेश राज्यातील रायबरेली जिल्ह्यात असलेल्या दहीगनवा गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने पंचवीस हजार रुपये खर्च करून सहा लाख रुपयांची कमाई केलेली आहे. या शेतकऱ्याने हे कसं शक्य केले? याबाबतची माहिती आपण बघणार आहोत.

 हंगामी भाजीपाला लागवड या शेतकऱ्यांसाठी ठरली महत्त्वाची

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील रायबरी जिल्ह्यात असलेल्या दहीगनवा या गावचे संजय राजपूत एक प्रयोगशील शेतकरी असून ते शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात. हंगामी पद्धतीने भाजीपाला पिकांची लागवड करतात.

उन्हाळ्यामध्ये ते काकडी या पिकाची लागवड करतात व या काकडी पिकाच्या माध्यमातून ते खूप चांगल्या प्रकारचा आर्थिक नफा सध्या मिळवत आहेत. यासोबतच ते हंगामी पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लावतात. या हंगामी भाजीपाला लागवडीतून ते कमी खर्चामध्ये जास्त नफा मिळवत आहेत.

हंगामी पद्धतीने भाजीपाला लागवड केल्यामुळे या भाजीपाल्याला बाजारात चांगली मागणी असते व भाव देखील चांगला मिळतो. संजय राजपूत हे गेल्या आठ वर्षापासून हिरव्या भाजीपाल्याची लागवड करत आहे. यामध्ये दोन एकर क्षेत्रावर ते कोबी,

टोमॅटो तसेच फ्लावर आणि बीट रूटची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. शेतात तयार केलेला भाजीपाला ते लखनऊ तसेच बाराबंकी व रायबरेली या ठिकाणी नेऊन विकतात. एका एकर करता साधारणपणे त्यांना यासाठी 25 हजार रुपये खर्च येतो व उत्पन्न एका वर्षाला पाच ते सहा लाख रुपये मिळवतात.

 हंगामी भाजीपाला लागवडीसाठी या गोष्टींची घ्यावी काळजी

हंगामी भाजीपाला लागवडीकरिता भाजीपालाचे रोपे निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे असे देखील त्यांनी म्हटले. तसेच जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ पुरेशा प्रमाणात असावे तसेच नर्सरी करिता जागा निवडताना ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही अशा जागेची निवड करावी असे देखील त्यांनी सांगितले.

तसेच पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण करण्यासाठी व्यवस्थित उपाययोजना वेळेत करावी. संजय राजपूत हे गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्या दोन एकर जमिनीवर हंगामी भाजीपाला लागवड करत आहेत व या माध्यमातून ते कमीत कमी खर्चामध्ये लाखोत नफा मिळवत आहेत. हंगामानुसार या भाजीपाल्याला बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्यामुळे त्यांना चांगला नफा मिळवता येणे शक्य झाले आहे.

Ajay Patil