शेतीमध्ये रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेच परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील खूपच हानिकारक ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन देखील प्रयत्नशील असून शेतकरी देखील आता बऱ्याच पद्धतीने सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. जेव्हापासून कोरोना येऊन गेला त्यानंतर बरेच व्यक्ती हे आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले असून सेंद्रिय पद्धतीने उत्पादित झालेल्या शेतीमालाला आणि भाजीपाल्याला आता मोठ्या प्रमाणावर मागणी वाढतांना दिसून येत आहे.
त्यामुळे येणाऱ्या कालावधीत सेंद्रिय शेतीला नक्कीच चांगले दिवस येतील याबाबत शंकाच नाही. याच दृष्टिकोनातून बरेच शेतकरी आता भाजीपाला आणि फळ पिके देखील सेंद्रिय पद्धतीने पिकवत असून चांगला बाजार भाव देखील मिळवत आहेत. आपल्याला माहित आहेच की सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशक यांना कुठल्याच प्रकारे थारा नसतो. गांडूळ खत तसेच शेण खत,
कंपोस्ट खत हे रासायनिक खतांना पर्याय म्हणून यामध्ये वापरले जातात आणि कीटकनाशके म्हणून निंबोळी अर्क, गोमूत्रापासून तयार केलेले विविध द्रव्य जसे की जीवामृत इत्यादींचा वापरावर भर दिला जातो. याच दृष्टिकोनातून जर आपण माण तालुक्यातील देवापुर येथील प्रगतिशील शेतकरी उद्धव बाबर यांनी अशाच पद्धतीने सेंद्रिय शेतीची कास धरली व निर्यातक्षम अशा केशर आंब्याचे उत्पादन घेऊन चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न देखील मिळवले.
सेंद्रिय पद्धतीने घेतले केशर आंब्याचे उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माण तालुक्यातील देवापूर येथील प्रसिद्ध शेतकरी उद्धव बाबर यांनी पळीत जमिनीवर पद्धतीने शेती फुलवली व निर्यातक्षम असा केशर आंब्याचे उत्पादन घेतले. त्यांनी कष्टाने पिकवलेला केशर आंबा हा विदेशात निर्यात केला व यातून चांगले उत्पन्न मिळवले. त्यांना जे.के. बसू सेंद्रिय व आधुनिक शेती पुरस्कार देऊन देखील गौरव करण्यात आलेला आहे. रासायनिक खतांचा जास्त वापर केल्यामुळे जे काही शेतीचे, पर्यावरणाचे आणि आरोग्याचे नुकसान होत आहे हे सगळ्या बाबी ओळखून त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.
तसेच रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर करून शेती केल्यामुळे खर्च जास्त होतो परंतु सेंद्रिय शेतीचा खर्च तुलनेने कमी होतो. सेंद्रिय पद्धतीने आणि खतांच्या वापरामुळे उत्पादित होणारा शेतमाल हा दर्जेदार असतो व तो विदेशात निर्यात करण्यासाठी असलेले जे काही निकष असतात ते पूर्ण करण्यासाठी पात्र ठरतो. त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्याला होत असतो असं देखील त्यांनी म्हटले. कष्टाने पिकवलेला शेतीमालाला चांगला भाव मिळावा याकरिता त्यांनी सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेतीची कास धरली.
त्यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रामध्ये 150 झाड केशर आंब्याची, हापूस तसेच रायवळ जातीच्या कलमांची लागवड केलेली आहे. यामध्ये खास करून 120 केशर आंब्याची झाडे असून ती 12 फुटांपेक्षा जास्त वाढलेली आहेत. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा व्यवस्थित वापर करून त्यांनी आंब्याची भाग चांगली फुलवली आहे. तसेच त्यांना सेंद्रिय शेती करण्याकरिता कृषी विभागाकडून देखील खूप मोठी मदत करण्यात आली असून त्यांना विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आलेला आहे. कृषी विभागाने विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना गांडूळ खत प्रकल्प व कंपोस्ट खत प्रकल्प तसेच इतर प्रकल्प उभारण्यात मदत केलेली आहे.
आंब्याची लागवड केल्यापासून तर आत्तापर्यंत त्यांनी या फळबागे करिता कुठल्याही प्रकारचे रासायनिक व खतांचा व कीटकनाशकांचा वापर केलेलाच नाही. सगळ्या बाब्या अगदी नैसर्गिक पद्धतीने हँडल करून त्यांनी बाग जोपासले आहे. मागच्या वर्षी त्यांनी पिकवलेला केशर आंबा हा निर्यातीकरता जे काही पात्र निकष असतात त्यामध्ये पात्र ठरल्यामुळे व्यापाऱ्यांनी बांधावर येऊन 150 रुपये किलोने खरेदी केला.
मागच्या वर्षापेक्षा यावर्षी त्यांनी पिकवलेल्या आंबा हा क्षमतेने आणि दर्जाने देखील चांगला असल्याने यावर्षी देखील परदेशात विक्री करता यावा म्हणून व्यापाऱ्यांनी बागेतच आंबा खरेदी केलेला आहे. कमीत कमी पाण्यात बागेचे नियोजन करताना ते प्रत्येक आंब्याच्या झाडाजवळ वाढलेले गवत तसेच झाडांचा पाला पाचोळा, चांगले कुजलेले शेण, तलावातील गाळाची माती असे एकत्रित मिश्रण करून ते प्रत्येक रोपाच्या बुंध्याभोवती गोलाकार पसरवून मग ठिबक सींचनाचा वापर करून त्याला पाणी देतात. त्याच्या झाडांच्या बुंध्या सभोवती कडधान्याबरोबरच देशी गाईच्या गोमूत्राचे स्लरी जीवामृत वर्षातून तीन वेळा देतात.
तसेच आंब्याच्या झाडाला मोहर आल्यानंतर परागीभवनाकरिता मधमाश्या व फुलपाखरांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे आणि तसेच किटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर करत नसल्यामुळे यांची संख्या देखील जास्त असते. परागीभवनाकरिता जास्त प्रमाणात मधमाशा याव्यात याकरिता त्यांनी नारळ, चिंच तसेच सरस, सिताफळ,
रामफळ तसेच जांभूळ, हादगा आणि आवळा यासारख्या इतर देशी विदेशी फळझाडांची लागवड केली व त्यामुळे बागेत मधमाशांचा वापर वाढू लागला आहे त्याचा नक्कीच फायदा आंबा बागेला होत आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर सेंद्रिय पद्धतीने देखील आपण निर्यातक्षम असे उत्पादन घेऊ शकतो हे सिद्ध होते.