Farmer Success Story:- माणसाच्या मनामध्ये जिद्द आणि प्रचंड प्रमाणात उर्मी आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारे कष्ट व चिकाटी राहिली तर माणूस कुठल्याही वयामध्ये अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवू शकतो.
व्यक्ती जर मनाने तरुण असेल तर शरीर कितीही वयाचे झाले तरी असे व्यक्ती कायम तरुणासारखे उत्साहाने काम करताना आपल्याला दिसून येतात. आज जरी शेती क्षेत्र म्हटले तरी देखील साठ ते 65 वयापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती देखील शेतीमध्ये आपल्याला काम करताना दिसून येतात
त्यांची कामाची पद्धत पाहून तरुणाई लाजवेल अशी त्यांची पद्धत असते. अगदी याच पद्धतीने जर आपण आटपाडी तालुक्यातील भोंड्या माळावर यशस्वी डाळिंबाची शेती करणाऱ्या यमाजी पाटील वाडी येथील 75 वर्षीय शेतकऱ्याने डाळिंबाच्या 4800 झाडातून डाळिंबाची 80 टन उत्पादन घेऊन 75 लाख रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. यामागे या शेतकऱ्याचा डाळिंब शेतीतील खूप दीर्घ अनुभव आणि सूक्ष्म नियोजन कारणीभूत आहे.
75 वर्षे शेतकऱ्याचा डाळिंब उत्पादनात हातखंडा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कायम दुष्काळप्रवण क्षेत्र किंवा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जाणारा आटपाडी तालुका म्हटले म्हणजे त्या ठिकाणी कायम पाण्याचे प्रचंड प्रमाणात दुर्भिक्ष असते. अशा परिसरामध्ये नारायण तातोबा चव्हाण यांनी तालुक्यामध्ये पहिल्यांदा 1979 यावर्षी डाळिंब उत्पादक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्याकडून डाळिंबाची रोपे आणून डाळिंबाची लागवड केली.
त्यावेळी डाळिंबाविषयी कुठल्याही प्रकारची माहिती किंवा अनुभव नसताना अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी डाळिंबाचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. आटपाडी तालुक्यात असलेले पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष परंतु त्या तुलनेत असलेले स्वच्छ हवामान डाळिंब पिकासाठी फायदेशीर ठरले व डाळिंबामध्ये त्यांना यश आले.
या अगोदर त्यांची 2500 डाळिंबाची झाडे होती व मागच्या वर्षी नवीन लागवड केली व एकूण डाळिंबाची लागवड आता 4800 झाडांपर्यंत पोहोचली आहे. जर आपण नारायण तातोबा चव्हाण यांच्या दिवसाची सुरुवात पाहिली तर ती डाळिंबाच्या बागेत होते व दिवसाच्या शेवट देखील हा डाळिंबाच्या बागेतच होतो. म्हणजे या वयात देखील ते डाळिंब बागेची एवढे समरूप किंवा एकरूप झाले आहेत
त्यांना बाग सोडून दुसरे काहीही सुचतं नाही. त्यांचे आज 75 वर्षे वय असले तरी देखील डाळिंब शेतीतील दीर्घ कालावधीचा अभ्यास आणि अनुभव हा त्यांचा मोठा ठेवा असून आज त्यांच्या या अनुभवामुळेच 18 एकर क्षेत्रावर चार हजार आठशे झाडांची लागवड त्यांनी केलेली आहे.
त्यांची जर डाळिंबाची बाग धरण्याची पद्धत पाहिली तर ती संपूर्ण बाग एका वेळेस न धरता तो तीन टप्प्यात विभागून धरतात. या डाळिंब बागाचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी तीन इंधन विहिरी तसेच दोन विहिरीतून पाण्याची सोय केलेली असून ट्रॅक्टरच्या बोरवेलने फवारणी केली जाते
तसेच बागेत कट्टे केलेले आहेत. डाळिंब फळांचे उन्हापासून संरक्षणासाठी आच्छादन आणि स्लरीचा वापर ते प्रामुख्याने करतात. या सर्व कामांसाठी त्यांनी शेतावर दोन कुटुंबे कायमस्वरूपी शेतात ठेवली असून वर्षभराचा रोजगार त्यांना दिला जातो.
यावर्षी आला 24 लाख खर्च
यावर्षी पहिल्यांदा चार हजार आठशे झाडांची तीन टप्पे करून एप्रिल ते जुलै अशा तीन महिन्याच्या कालावधीत त्यांनी हंगामाचे नियोजन केले. आतापर्यंत त्यांना मिळालेले डाळिंबाचे दर पाहिले तर ते 128, 120, 110 आणि 90 रुपयाने मिळाले आहेत
व सर्वात कमी दर हा 60 रुपये इतका मिळाला आहे. जवळजवळ आतापर्यंत 70 टन उत्पादन हाती आले आहे व अजून सातशे झाडांचा प्लॉट शिल्लक असून त्याकरिता 24 लाख रुपये खर्च आलेला आहे. विशेष म्हणजे चव्हाण हे प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने उत्पादन काढण्यात यशस्वी होतात व लाखो रुपयांचे उत्पादन मिळवतात.