कृषी

Cotton Variety: खरिपात करा कापसाच्या ‘या’ वाणांची लागवड आणि मिळवा कापसाचे भरघोस उत्पादन, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Cotton Variety:- खरीप हंगाम 2024 आता तोंडावर येऊन ठेपला असून त्यामुळे आता बरेच शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीमध्ये काही दिवसात व्यस्त होतील. महाराष्ट्राचा विचार केला तर खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.

खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या दोन्ही पिकांवर अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी या दोन्ही पिकांच्या बाबतीत अत्यंत सावधानतेने सगळ्या गोष्टींचे निर्णय घेत असतात. त्यामुळे भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकरी चांगल्या वाणाची निवड करतात.

कपाशी पिकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कपाशी लागवड केली जाते. या दृष्टिकोनातून आपण या लेखात कपाशी पिकाचे काही चांगले उत्पादन देणाऱ्या वाणाची माहिती थोडक्यात बघू.

 कपाशीचे हे वाण देतील भरघोस उत्पादन

1- तुलसी कंपनीचे कबड्डी शेतकऱ्यांमध्ये हे एक प्रसिद्ध वाण आहे व बरेच शेतकरी या वाणाची लागवड करतात. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कपाशीचा या वाणाची लागवड केली जाते. मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये या जातीच्या कापसाची लागवड आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते.

कबड्डी जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही कीड व रोगांना खूप कमी प्रमाणात बळी पडते व अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली तरी चांगले उत्पादन मिळते. तसेच त्यापेक्षा कमी पाऊस पडला तरी देखील चांगले उत्पादन या वानापासून मिळते.

2- युएस ॲग्री सीड्स कंपनीचे युएस 7067- कपाशीचा हा वाण देखील खूप महत्वपूर्ण असून भरघोस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या वाणाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना एकरी 12 ते 17 पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. बागायती आणि जिरायती अशा दोन्ही परिस्थितीमध्ये या वाणाचे उत्पादन घेतले जाऊ शकते.

3- ऍग्रो स्टारचे शिवांश राज्यातील काही भागात या कपाशीच्या वाणाची लागवड केली जाते. जर हा वाणाची बागायती क्षेत्रात लागवड केली तर भरपूर उत्पादन मिळते. या वाणाची कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवड करू नये असा सल्ला देण्यात आला आहे. यापासून 18 ते 19 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

4- मोक्ष केसीएच 15K 39 BG 2- मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी या वाणाच्या लागवडीतून भरघोस उत्पादन मिळवले आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन करून मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी 19 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड करून यापासून चांगले उत्पादन मिळू शकते. कापसाच्या या वाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा धागा हा 25 ते 29 एमएम एवढा म्हणजेच मध्यम स्टेपलचा असतो. तसेच महत्त्वाचे म्हणजे या जातीच्या कपाशीवर रस शोषक किडी व रोगांचा फारसा प्रादुर्भाव दिसून येत नाही.

Ajay Patil