Tomato Price : इथे होतीय सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tomato Price : प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय सहकारी उपभोक्ता महासंघाच्या वतीने (एनसीसीएफ) नवी दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत गेल्या १५ दिवसांत तब्बल ५६० टन टोमॅटोची सवलतीच्या दरात विक्री करण्यात आली आहे.

एनसीसीएफच्या या निर्णयामुळे टोमॅटोचे दरात घसरण होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एनसीसीएफला अनुदानित दराने टोमॅटोची विक्री करण्याचे निर्देश दिले होते. एनसीसीएफने १४ जुलै रोजी ९० रुपये प्रति किलो अनुदानित दराने टोमॅटोची विक्री सुरू केली होती.

मागणी लक्षात घेता त्यानंतर एनसीसीएफने गेल्या आठवडाभरापासून या तिन्ही राज्यांमध्ये ७० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री केली आहे. एनसीसीएफचे व्यवस्थापकीय संचालक अनीस जोसेफ चंद्रा यांनी सांगितले की, २८ जुलैपर्यंत दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ५६० टन टोमॅटोची विक्री करण्यात आली.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र अर्थात एनसीआरमध्ये मोबाइल व्हॅन, निवडक केंद्रीय भंडार आणि सरकार पुरस्कृत खुल्या डिजिटल व्यावसायिक केंद्रातून टोमॅटोच्या विक्रीत एनसीसीएफ सक्रिय असल्याचे चंदा यांनी पुढे सांगितले.