कृषी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केली करडईची ‘हे’ 2 वाण! हेक्टरी मिळेल 15 ते 20 क्विंटल उत्पादन; वाचा या वाणाची विशेषता

Published by
Ajay Patil

Safflower Farming:- कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये देशातील कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन संस्था यांची महत्त्वाची भूमिका असून विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थांच्या माध्यमातून अनेक पिकांची दर्जेदार आणि भरघोस असे उत्पादन देणारे वाण विकसित करण्यात येतात व यामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होतो.

इतकेच नाहीतर कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा विकास व त्याचा वापर या माध्यमातून देखील कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांची मोलाची भूमिका आहे.

याच पद्धतीने जर आपण बघितले तर महाराष्ट्रातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाने करडई या पिकाचे दोन वाण विकसित केले असून हे शेतकऱ्यांसाठी करडईच्या भरघोस उत्पादन मिळण्याच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचे ठरतील.

वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने विकसित केली करडईचे दोन वाण
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने करडई या पिकाचे नवीन पीबीएनएस 221 आणि पीबीएनएस 222 हे दोन वाण नुकतेच विकसित केले आहेत.

हैदराबाद येथील भारतीय तेलबीया संशोधन संस्था येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक करडई कार्यशाळेमध्ये झोन 1 करिता प्रसारीत करण्यासाठी या वानांची शिफारस करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांचा यामध्ये समावेश आहे.

या दोन्ही वानांची वैशिष्ट्य बघितले तर यामध्ये 34% पेक्षा जास्त तेलयुक्तता आढळून आले आहे. जी पूर्वीच्या वानांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. तसेच मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर पावसावर अवलंबून असलेल्या परिस्थितीत जर विचार केला तर हेक्टरी 15 क्विंटल व बागायती म्हणजेच सिंचनाच्या सुविधा असतील तर हेक्टरी 18 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणे शक्य आहे.

तसेच यामधील पीबीएनएस 222 या वाणाचे तेल उत्पादन 34.4% म्हणजेच 533 किलो हेक्टरी इतके आहे. तसेच हे करडईची दोन्ही वाण पानावरील ठिपके यासारख्या रोगांना मध्यम प्रतिकारक असून सिंचन म्हणजेच बागायती व पावसावर अवलंबून असणाऱ्या शेती अशा दोन्ही प्रकारच्या शेती करिता योग्य असे वाण आहेत.

Ajay Patil