Vegetable Farming : मित्रांनो आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या भाजीपालामध्ये औषधी गुणधर्म अधिक असल्याने डॉक्टर देखील याच्या सेवनाचा सल्ला देत असतात. हिरव्या भाज्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आपणा सर्वांनाच माहीत आहे.
पालक ही देखील अशीच एक भाजी आहे. पालक आरोग्याला तर फायदेशीर आहेच शिवाय याची लागवड शेतकऱ्यांना देखील अधिक फायदा मिळवून देत आहे. मित्रांनो पालक या भाजीपाला पिकाची बारा महिने शेती केली जाऊ शकते.
मात्र असे असले तरी या भाजीपाला पिकाला बाजारात हिवाळ्यात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात या पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे. मित्रांनो आज आपण पालक शेतीमधील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्याचा सविस्तर प्रयत्न करणार आहोत.
पालकाची लागवड कशी करावी बर :-
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पालक लागवडीसाठी फारसा खर्च येत नाही. शिवाय पालक हे पीक कमी कालावधीत तयार होत असल्याने शेतकरी बांधवांना अल्पावधीतच या पिकातून चांगली कमाई होण्यास सुरुवात होते. पालकाची एकदा लागवड केली की जवळपास पाच ते सहा वेळा त्याची काढणी केली जाते. एकदा लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना या पिकातून तब्बल सहा वेळा उत्पादन मिळणार आहे.
यानंतर, सुमारे 10 ते 15 दिवसांत ते पुन्हा काढणीसाठी तयार होते. पालकाची लागवड वर्षभर होत असली तरी त्याची पेरणी वेगवेगळ्या महिन्यात करणे आवश्यक असते. अशा प्रकारे शेतकरी बांधव पालकाच्या लागवडीतून वर्षभर कमाई करू शकतात. पालक लागवडीसाठी हलकी चिकणमाती असलेली जमीन उत्तम असते. अशा शेताची निवड करावी ज्यामध्ये पाण्याचा चांगला निचरा होईल आणि सिंचनात कोणतीही अडचण येणार नाही.
पालक लागवडीपूर्वी शेताची नांगरणी हॅरो किंवा कल्टिव्हेटरने करावी जेणेकरून माती भुसभुशीत होईल. चांगल्या उत्पादनासाठी, शेतात बेड तयार करण्यापूर्वी शेणखत 25 ते 30 टन/हेक्टर या दराने टाकावे. पेरणीच्या वेळी 20 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टरी शेतात टाकल्यास खूप चांगले उत्पादन मिळते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता तुमची शेती पालक लागवडीसाठी पूर्णपणे तयार आहे. पालकाची काढणी झाल्यावर हेक्टरी 20 किलो नत्र शेतात टाकावे. यामुळे पालकाची वाढ चांगली होईल.
पालक पेरण्याची योग्य वेळ
पालकाची लागवड वर्षभर करता येते, परंतु त्याची पेरणी करण्याची योग्य वेळ फेब्रुवारी ते मार्च आणि नोव्हेंबर ते डिसेंबर ही आहे. या महिन्यांत पालकाची पेरणी केल्यास खूप फायदा होतो. त्यांच्या बियाण्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ते 25 ते 30 किलो बियाणे/हेक्टर दराने पेरले जाते. पेरणीपूर्वी बियाणे 5-6 तास पाण्यात भिजवणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर पेरणीच्या वेळी शेतात ओलावा असावा.
काढणी कधी करावी बर…!
पालक पेरल्यानंतर साधारण 25 दिवसांनी पानांची लांबी 15 ते 30 सें.मी.पर्यंत पोहोचल्यावर पहिली काढणी करावी. कापणी करताना लक्षात ठेवा की पाने झाडांच्या मुळांपासून 5-6 सेंटीमीटर वर काढली पाहिजेत. यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने काढणी करावी. पीक काढणीनंतर पाणी द्यावे.
तुम्ही किती कमवू शकता
हेक्टरी अंदाज घेतल्यास 150 ते 250 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. जे बाजारात 15 ते 20 रुपये किलो दराने विकले जाऊ शकते. अशाप्रकारे हेक्टरी 25 हजार रुपये खर्च काढला तरी 200 क्विंटल पालकाच्या उत्पादनातून 3 महिन्यांत सुमारे 2 लाख 75 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.