Viral News : शेळीपालन हा एक मुख्य व्यवसाय आहे. हा व्यवसाय विशेषता मांस उत्पादनासाठी केला जात असला तरी देखील शेळ्यांची दुधाची मागणी अधिक आहे. बाजारात शेळीच्या दुधाला चांगला दर देखील मिळत मिळतो यामुळे दूध उत्पादनासाठी देखील हा व्यवसाय केला जातो.
शेळ्या दूध देतात हे आपणा सर्वांना माहीत आहे, पण तुम्हाला माहित आहे का की बोकड पण दूध देतात. हे ऐकायला जरा विचित्र वाटलं असेल, पण हे खरं आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील सरताज फार्म हाऊसमध्ये दररोज दूध देणाऱ्या चार शेळ्या असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
या फार्महाऊसमध्ये राजस्थान आणि पंजाब प्रजातीच्या 4 बोकड या फार्म हाऊस मालकाने पाळले आहेत. विशेष म्हणजे हे बोकड दररोज सुमारे 250 ग्रॅम दूध देतात. त्यांच्या शरीराची रचना बोकडासारखीच आहे , परंतु शेळ्यांप्रमाणे गुप्तांगावर दोन स्तन आहेत.
या बोकडाची किंमत 52 हजार रुपयांपासून ते 4 लाख रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे बोकड दूध देत असल्याने या बोकडाला पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. हार्मोन्समधील बदलामुळे अशी प्रकरणे समोर येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
असा प्रकार राजस्थानमधूनही समोर आला होता
काही वर्षांपूर्वी राजस्थानमधील धौलपूरमधून असेच एक प्रकरण समोर आले होते. येथे एक बोकड चर्चेचा विषय बनला होता कारण तो दूध देत होता. याबाबत पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांच्या मते, जनावराच्या भ्रूण अवस्थेत लिंग निर्धारण दरम्यान हार्मोनल असंतुलनामुळे होते. शेळीच्या मालकाने सांगितले की, बोकड खरेदी केल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी बोकडाला कासे विकसित झाल्याचे आमच्या लक्षात आले.
मग काय या बोकडाचे दूध काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा बोकडाने दूध दिले. ते म्हणाले की, हे बोकड दररोज 200-250 ग्रॅम दूध देऊ शकते. एका पशुवैद्यकाने सांगितले की, गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या लिंग निर्धारणाच्या वेळी, जर मातेमध्ये नर आणि मादी दोघांचे लिंग निर्धारित करणारे संप्रेरक समान प्रमाणात संतुलित असतील, तर ते स्त्री आणि पुरुष दोन्ही गोनाड्स आणि दुय्यम लिंग वर्ण विकसित करतात.
निश्चितच बोकड दूध देते मात्र चमत्काराने नव्हे तर यामागे देखील सायन्स आहे. सायन्सच्या मते हार्मोन्सच्या गडबडीमुळे बोकड दूध देऊ शकते. निश्चितच सध्या हे बोकड चर्चेचा विषय ठरत आहेत.