Watermelon : वावर है तो पॉवर है !! टरबूज शेतीतून मिळवले 1 अब्ज रुपयांचे उत्पन्न; एका दिवसाला दीड कोटीचे टरबूज होतं आहे विक्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- वावर है तो पॉवर है असं का म्हटलं जातं याचं जिवंत उदाहरण समोर आला आहे ते बिहार राज्यातून. बिहार राज्याच्या पश्चिम चम्पारण (West Champaran) या जिल्ह्यातील बगहा येथील गंडक नदीकाठच्या दियारा परिसरातील शेतकरी टरबूजाची शेती (Watermelon farming) करून आपले भविष्य घडवत आहेत.

या नदीकाठच्या भागात जवळपास 10 हजार शेतकरी शेती करीत आहेत. या नदीकाठच्या परिसरात सर्व शेतकऱ्यांनीp टरबुजाची शेती केली आहे.

विशेष म्हणजे इथून टरबूजांना एवढी मागणी आहे की, शेतकरी दररोज दीड कोटी रुपयांची कमाई करत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, या भागातून दररोज 12-15 हजार क्विंटल टरबूज देशातील विविध बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी पाठवले जात आहे.

सध्या येथील टरबूजला सुमारे 10 रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळतं आहे. येथून टरबूज बिहारमधील विविध बाजार समितीमध्ये पाठवले जाते तसेच नेपाळ, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) देखील येथील टरबूजची रवानगी केली जात आहे.

या नदीकाठचे शेतकरी सांगतात की, सलग दोन वर्षे करोनाच्या काळात टरबूज शेताबाहेर देखील त्यांना नेता आले नाही यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

मात्र यंदा वाढत्या उष्णतेमुळे एकीकडे पीक चांगले आले आहे तर दुसरीकडे त्याची मागणी देखील वाढली आहे. गतवर्षी मागणी नसल्याने आणि कोरोनाचे निर्बंध असल्याने टरबूज 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात होते. मात्र यावेळी व्यापारी एक हजार रुपये क्विंटल या दराने टरबूज खरेदी करत आहेत.

दिवसाकाठी दीड कोटींची उलाढाल बगहा येथील मंगळपूर दियारा ते मधुबनीपर्यंत सुमारे 12 ते 13 किमी नदीकाठावर टरबूजाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये शास्त्रीनगर, पुरहाऊस, कैलाश नगर, गोदियापट्टी, रामधाम मंदिर, मालपुरवा, नारायणपूर, राजवातिया, रतवाल, धान्हा इत्यादी ठिकाणी टरबूजांचे वजन केले जाते.

बगाहा येथील जिंदाल धर्मकाट्याचे ऑपरेटर विकास कुमार यांनी सांगितले की, बगाहाच्या 1 धर्मकाट्यातून 10 चाकी ट्रक 8, डीसीएम 10 ते 15 आणि पिकअप 25 ते 30 वजनासाठी येत आहेत. अशाप्रकारे या एका धर्मकाट्यातून दररोज 3500 क्विंटल टरबूज निघते.

विवेक धर्मकाटा चौतारावा, साई गुरू धर्मकाटा मालपुरवा, मधुबनी येथे स्थित धर्मकाटा या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात टरबूजांचे वजन केले जातं आहे. याशिवाय छोटे शेतकरीही शेतात दीड ते दोन क्विंटल वजनाचे यंत्र लावून टरबूज विकत आहेत. यामुळे येथून दररोज सुमारे 12 ते 15 हजार क्विंटल टरबूज विकले जात आहे. हा टरबूजचा व्यवसाय सुमारे 45 दिवस चालतो.

येथील भाग गंडक नदीचा किनारा असल्याने पुराच्या वेळी शेतात वाळू पसरते यामुळे या नदीच्या प्रदेशात गहू, भात, मका या पिकांची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत नव्हती.

यानंतर येथील शेतकऱ्यांनी दियारा परिसरात काबाडकष्ट करून टरबूज, काकडी इत्यादी वेलवर्गीय पिकांची लागवड सुरू केली.स्थानिक बाजारपेठेत पूर्वी टरबूजांना मागणी होती.

पण आता टरबूज खरेदीसाठी नेपाळ, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील व्यापारी देखील या ठिकाणी पोहोचत आहेत. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यातच पीक पाहून आगाऊ बुकिंग व्यापारी करून जातात. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की येथील शेतकरी रासायनिक खतांपेक्षा शेणखताचा जास्त वापर करतात.

त्यामुळे येथील टरबुजाचा गोडवा अधिक असतो. याशिवाय सेंद्रिय खतांचा वापर केल्याने पीक काढणीनंतरही बराच काळ चांगले राहते. यामुळे येथील व्यापारी येथील टरबूज मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. टरबूज 10 ते 12 दिवस खराब होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लांबचा प्रवास करून टरबूज दूरवर पाठवले जातात.