Wheat Farming : देशात रब्बी हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी बांधव आता रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी सज्ज झाला आहे. मित्रांनो रब्बी हंगामात शेतकरी बांधव गव्हाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. गव्हाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली बक्कळ कमाई देखील होत असते.
देशात शरबती बन्सी गहू आणि खपली गहू या गव्हाच्या दोन प्रकाराची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मित्रांनो आज आपण खपली गहू लागवड तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत.
खपली गहू लागवडीसाठी इतर सामान्य गहू लागवडीप्रमाणेच वातावरण आणि हवामान आवश्यक असते. या गव्हाची लागवड आपल्या महाराष्ट्रात केले जाते. तर मग मित्रांनो जाणून घेऊया खपली गहू लागवड तंत्रज्ञानाबद्दल.
खपली गव्हाचे सुधारित वाण तरी नेमक कोणतं :- मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना खपली गव्हाची शेती करायची असेल तर शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी एमपी २००, डी.डी.के – १००१, डी.डी.के – १००९, डी.डी.के – १०२५, डी.डी.के – १०२९, एमएसीएस – २९७१, एच. डब्लू – १०९८ यापैकी कोणत्याही एका वाणाची निवड करावी. या वाणाच्या पेरणीतून शेतकऱ्यांना निश्चितच अधिक उत्पादन मिळणार आहे.
खपली गहू पेरणी नेमकी केव्हा करतात :- मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, खपली गव्हाची पेरणी सामान्य गव्हा प्रमाणे १ ते २० नोव्हेंबर दरम्यान करावी. कृषी तज्ञांच्या मते १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान झाले की खपली गहू पेरणी करून घ्यावी. निश्चितच खपली गव्हाला हवामान अधिक मानवते.
मित्रांनो खपली गव्हाच्या शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी तसेच खपली गहू रोगमुक्त उत्पादित करण्यासाठी पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यावर ३ ग्रॅम थायरम आणि अझॅटोबॅक्टर व स्फुरद विद्राव्य जिवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावून बीजोपचार करण्याचा सल्ला जाणकार लोकांकडून देण्यात आला आहे.
हेक्टरी किती बियाणे वापरावे :- मित्रांनो खपली गव्हाची बागायती भागात पेरणी करण्यासाठी १०० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरण्याचा सल्ला जाणकार लोकांकडून देण्यात आला आहे. तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे खपली गव्हाची बागायती भागात पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर २२.५ सेंमी ठेवले पाहिजे.
ही काळजी घेतल्यास खपली गव्हाचे अधिक उत्पादन मिळू शकते. दरम्यान पेरणी करताना ५ ते ६ सेंमी पेक्षा जास्त खोल गव्हाचे बियाणे पडणार नाही याबाबत शेतकऱ्यांनी खात्री करून घ्यावी. कारण की अधिक खोलीवर बियाणे रुजल्यास बियाणे अंकुरण पावयाला त्रास होतो आणि साहजिकच यामुळे उत्पादनात घट होऊ शकते.
खपली गव्हासाठी खत व्यवस्थापन :– मित्रांनो खपली गव्हाची पेरणी करण्यापूर्वी म्हणजे जमिनीची पूर्व मशागत करताना २५ गाड्या शेणखत टाकले पाहिजे. इतर कोणत्याही पिकाप्रमाणे खपली गव्हाला शेणखत दिल्यास उत्पादनात भर पडू शकते.
पेरणी करताना नत्र, स्फुरद, पालाश प्रत्येकी ५० किलो, खत मात्रा द्यावी व उर्वरीत अर्धी नत्र मात्रा म्हणजे ५० नत्र प्रति हेक्टर पेरणीनंतर ३० दिवसांनी दिली पाहिजे असे कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी नमूद केले आहे. दरम्यान खतांची मात्रा पिकाला देताना शेतकरी बांधवांनी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.