कृषी

Wheat Farming : शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ‘या’ जातीच्या गव्हाची शेती बनवणार लखपती ! वाचा या जातीविषयी सविस्तर

Published by
Ajay Patil

Wheat Farming : देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात शेतकरी बांधव सर्वाधिक गव्हाची शेती करत असतात. मित्रांनो महाराष्ट्रात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. खरं पाहता देशाच्या एकूण उत्पादनात पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यातील गहू उत्पादनाचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

मात्र महाराष्ट्रात देखील गव्हाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय असून शेतकऱ्यांना गव्हाच्या शेतीतून चांगली कमाई होत आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांना यावर्षी गव्हाच्या शेतीतून बक्कळ कमाई करायचे असेल तर शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी केली पाहिजे.

अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या काही सुधारित जातींची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया गव्हाच्या काही सुधारित जाती.

GW 322 :- गव्हाची ही एक सुधारित जात आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हीं जात 115-120 दिवसांत उत्पादन देण्यासाठी तयार होते. गव्हाचे GW 322 जातीची उत्पादन क्षमता 60 – 62 क्विंटल पर्यंत आहे. GW 322 गव्हाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीच्या गव्हाची भारतातील सर्व राज्यांमध्ये लागवड करता येते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती नुसार ही जात ३-४ पाण्यात काढणीसाठी तयार होत असते.

पुसा तेजस ८७५९ :- गव्हाची ही एक उच्च उत्पादन देणारी जात आहे. 2019 मध्ये पुसा तेजस 8759 गहू विकसित करण्यात आला आहे, जबलपूर कृषी विद्यापीठात एक हेक्टरमध्ये 70 क्विंटल पुसा तेजस गव्हाचे उत्पादन झाले होते, त्यानंतर या गव्हाच्या जातीबद्दल शेतकऱ्यांची आवड वाढली. गव्हाची ही जात साधारणतः ११०-११५ दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते. गव्हाची हीं जात कमी पाण्यात उत्पादन देण्यास तयार होते.

GW 273 :-  मित्रांनो गव्हाची ही देखील एक सुधारित जात आहे. या जातीची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. गव्हाचे GW 273 वाण सुमारे 115-125 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते. गव्हाचे GW 273 जातीची उत्पादन क्षमता 60 – 65 क्विंटल पर्यंत आहे. ही जात ३-४ पाण्यात उत्पादन देण्यास तयार होते.

Ajay Patil