कृषी

अस्मानी सुलतानी संकटात शासन का छळतंय? कापसाला विम्यातून वगळले, मका, सोयाबीनला अद्याप २५ टक्केच अग्रीम

Published by
Ahmednagarlive24 Office

 Agricultural News : सध्या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला. मान्सूनमध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे खरिपाची पहिली पिके गेलीच परंतु रबीतही अडचण आली. अशा पद्धतीने अस्मानी सुलतानी संकटात शेतकरी सापडला आहे.

त्यातच आता विम्याचा आधार वाटत असताना कपाशीला विम्यातून वगळले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे.

* कापूस उत्पदक जास्त तरीही विचार नाही

सध्या सोयाबीन व मका पिकांना दुष्काळामुळे २५ टक्के अग्रीम विमा मिळाला. परंतु कापूस उत्पादकांना मात्र वगळण्यात आले. जिल्ह्यात कापूस उत्पादक मोठ्या संख्येने आहेत. तरी त्यांना विचार केला गेला नाही.

त्यामुळे सरकारविरोधात शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्याचा विचार करता श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी व प्रवरा नदीकाठच्या भागामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

तसेच दक्षिणेत देखील अनेक भागात कापूस लागवड केली जाते. परंतु कापसाचे क्षेत्र मोठे असूनही व दुष्काळाने कपाशीचे नुकसान होऊनही विमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

* एक रुपयात पीक विम्याचा केवळ फार्स ?

अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस उत्पादनाला मोठा फटका बसला. यामध्ये शेतकऱ्यांना सरकारच्या एक रुपयात विमा योजनेचा मोठा आधार वाटत होता. परंतु कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विमा मिळालाच नसल्याने एक रुपयात पीक विम्याचा केवळ फार्स ठरला का? असे शेतकरी विचारत आहेत.

* शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक

शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक झाले असून विमा कंपन्यांनी २५ टक्के अग्रीममधून कापूस का वगळला, हे स्पष्ट झालेले नाही. कोणत्या निकषांच्या आधारे हा विमा देण्यात आला याचा उलगडा न झाल्याने आता याविरुद्ध व्यापक लढा उभारावा लागेल असे शेतकरी संघटनेचे नेते म्हणतायेत.

Ahmednagarlive24 Office