Farmer succes story: मित्रांनो देशात असे अनेक पशु आहेत ज्यांना लाखोंच्या घरात बोली लावली जाते. हरियाणा राज्यातील (Hariyana) काही रेडे तर अक्षरशः करोडो रुपयाला विकले गेले आहेत. या मध्ये सुलतान (Sultan Buffalo) या 21 कोटी किंमत असलेल्या रेड्याचा देखील समावेश होता जो की नुकत्याच काही महिन्यापुर्वी काळाआड गेला आहे.
मित्रांनो पण आज आपण आपल्या राज्यातील सातारा जिल्ह्याच्या (Satara) पाटण तालुक्यातील एका अनोख्या बोकडविषयी (Sonya Goat) जाणुन घेणार आहोत ज्याला तब्बल 23 लाखांची बोली लागली आहे. यामुळे हा बोकड सध्या पंचक्रोशीत मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. चला तर मग जाणुन घेऊया या विवीआयपी लखपती बोकडविषयी.
कुठला आहे ‘हा’ लखपती बोकड
मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात मौजे त्रिपुडी येथील रहिवाशी शेतकरी (Farmer) रामचंद्र देसाई यांचा हा बोकड आहे. या बोकडाला रामचंद्र यांनी सोन्या असे नाव ठेवले आहे. या बोकडाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याच्या कपाळावर चंद्रकोर आहे.
कपाळावर चंद्रकोर असल्याने या बोकडाला बाजारात मोठी मागणी आहे. या बोकडाचे वजन तब्बल 65 किलो एवढे आहे. याच्या कपाळावर असलेली चंद्रकोर आणि त्याच्या वजनामुळे हा बोकड पंचक्रोशीत मोठा चर्चेचा विषय आहे.
लाखोंची लागली बोली
रामचंद्र यांच्या मते, या बोकडाला तब्बल 23 लाखांची बोली लागली आहे. निश्चितच बोकडाला लागलेली ही ऐतिहासिक बोली सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रामचंद्र यांच्या मते, या बोकडाच्या कपाळावर जन्मताच चंद्रकोरची खून असल्याने त्यांच्या गावात तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीत हा बोकड मोठा प्रसिद्ध आहे.
मित्रांनो असे सांगितले जाते की, चंद्रकोरीची कपाळावर खून असल्याने बकरी ईद मध्ये अशा बोकडाचा कुर्बानीला मोठे अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे मुंबई आणि पुणे शहरातून मुस्लिम बांधवांच्या वतीने या बोकडाला लाखो रुपयांची बोली लागली आहे.
रामचंद्र यांच्या मते आतापर्यंत या बोकडाला 18 लाख 50 हजारांपर्यंत बोली लागली आहे. विशेष म्हणजे यामध्ये अजून वाढ होणार असल्याची रामचंद्र यांची आशा आहे. निश्चितच हा बोकड आपल्या किमतीमुळे आणि कपाळावर असलेल्या चंद्रकोरी मुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठा लोकप्रिय झाला असून सर्वत्र याचीच चर्चा बघायला मिळत आहे.