Laal Singh Chaddha : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा सध्या त्याचा आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढा मुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट रिलीजपूर्वीच (Release) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर (Social media) होत आहे. दरम्यान अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल रशीद खानने (Kamal Rashid Khan) या चित्रपटाच्या कमाईबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

असे केआरकेने सांगितले

आमिर खान, नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या त्यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. करण जोहरच्या शोमध्ये (Karan Johar Show) आमिर खानने या चित्रपटाबद्दल बरेच काही सांगितले.

याशिवाय आमिरने लोकांना या चित्रपटावर बहिष्कार घालू नये अशी मागणी केली होती. पण त्याचा फारसा परिणाम होत नसून आता सोशल मीडियावर आमिर खानच्या या चित्रपटाला विरोध होत आहे. आता यादरम्यान, केआरकेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

ज्यामध्ये तो आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाशी संबंधित पोस्टर उघड करताना दिसत आहे. पोस्टरनुसार, आमिर खानच्या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 550 कोटींची कमाई केली आहे. कमाल रशीद खान यांनी हे पूर्णपणे बनावट आहे, असे काहीही झाले नाही, हा दावा केला आहे.

आमिर खानचा चित्रपट कधी रिलीज होणार?

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट याच महिन्यात म्हणजेच 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.