अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोभाळणे गावातील ठाकर वस्तीवरील तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
त्यात मोटरसायकल, पैसे, धान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. काल (शुक्रवार) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
ठाकर वस्ती येथील युवराज गांगड व अन्य तीन घरे आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे.
या आगीत शेळ्या, मोटारसायकल, पैसे, धान्य, कपडे, कागदपत्रे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चार कुटुंब उघड्यावर आली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि कोंभाळणे शिवारातील ठाकर वस्तीवर युवराज गावंडे, सुनीता गावंडे, सखाराम गावंडे, सखूबाई गावंडे या चौघांची कुटुंबे राहतात.
ही कुटुंबे कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यांच्या घरांना आग लागली. त्याची माहिती मिळताच कुटुंबे घटनास्थळी आली, तसेच आग विझविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील चाळीस पोती धान्य, पैसे, मोटारसायकल, कागदपत्रे, शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
जळते घर उघड्या डोळ्यांनी पाहताना या कुटुंबांचे अश्रू अनावर झाले. घरात झोपलेल्या दोन वर्षांच्या मुलास सखूबाई गावंडे यांनी आगीतून बाहेर काढले.
त्यामुळे अनर्थ टळला. हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबात अग्निकांड झाला. यामध्ये त्यांचे सर्व जिवनपयोगी सामान जळून खाक झाले.
त्यामध्ये या चिमुकल्या लेकराच्या सायकलीची पण राख झाली. आणि हा चिमुकला खिन्न नजरेने राखेकडे बघत राहिला. हा क्षण पाहुन आज डोळे भरून आले आहे.
डोळ्यासमोर आपला संसार उध्वस्त होत असताना पाहिल्याने कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले. ही कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.
तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.