फक्त 5 रूपयात 1 GB डाटा, ‘ही’ कंपनी देतेय Jio पेक्षाही मोठी ‘ऑफर’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- जियो (Jio), एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या देशातील तीन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत.

वायरलेस सब्सक्रायबर्सबाबत बोलायचे झाल्यास या कंपन्यांचा मार्केट शेयर 90 टक्के इतका आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तिन्ही कंपन्या सातत्याने नवनवे आणि किफायतशीर प्रीपेड प्लॅन्स सादर करत असतात, सोबत अधिक डेटा, ओटीटी सब्सक्रिप्शन्स आणि इतरही अनेक ऑफर्स देतात.

ऑनलाईन अभ्यास असो किंवा घरून काम. इंटरनेटशिवाय व्यक्ती यापैकी कोणतीही गोष्ट करू शकत नाही.लोकांच्या गरजा लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा जास्त ऑफर देत आहेत.

ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. एअरटेलने असाच एक नवीन प्लान सादर केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना दररोज सरासरी फक्त 5 रुपये खर्च करून 1GB डेटा आणि इतर सुविधा मिळवू शकतात. एअरटेल कंपनीचा हा नवीन प्लान 448 रुपयांचा आहे. 28 दिवसांच्या वैधता असलेल्या या प्लानमध्ये दररोज 3GB डेटा दिला जात आहे.

अशा प्रकारे 28 दिवसात तुम्ही एकूण 84GB डेटा घेऊ शकता. त्यानुसार तुम्हाला दररोज सुमारे 5 रुपयांमध्ये 1GB डेटा मिळत आहे. विशेष गोष्ट म्हणजे कंपनी या योजनेत डिस्नी + हॉटस्टारचे एक वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शनही देत ​​आहे.

ही सबस्क्रिप्शन स्वतंत्रपणे खरेदी करण्यासाठी 399 रुपये मोजावे लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मिळून अनेक फायदे मिळतात, तर या प्लॅनचा डेटा खर्च कमी होतो आणि तुम्हाला दररोज सुमारे 5 रुपयांमध्ये 1GB डेटा मिळू शकतो.

अहमदनगर लाईव्ह 24