चार गावठी दारू अड्डे उध्वस्त करून १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील ४ अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली उध्वस्त करून १ लाख ४० हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करून ४ आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव आऊटसाईड येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन

छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हरेगाव आऊट साईड परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला.

अशोक बाबुराव गायकवाड, सुधीर काशिनाथ गायकवाड, अशोक रामभाऊ गायकवाड, संतोष चंद्रभान गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे हरेगाव आऊटसाईड परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून

सदर कारवाईचे हरेगाव येथील महिलांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. सदरची कारवाई श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक,

अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, हेडकोन्स्टेबल सुरेश औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, लक्ष्मण राऊत, अमोल गायकवाड, प्रवीण भोजे, आरपीसी पथक आदींनी केली.

Ahmednagarlive24 Office