नववर्षात विविध खगोलीय घटना घडणार असून अतिशय विलोभनीय अवकाशीय दृश्य पाहावयास मिळणार आहेत. भारतात १ खग्रास चंद्रग्रहण, १० उल्कावर्षाव, ४ धुमकेतू, ६ सुपरमून, चंद्रासोबत ग्रहताऱ्यांच्या शेकडो युती, ग्रहांच्या प्रतियुती, तेजस्वी ग्रह-तारे आणि इस्त्रोच्या तीन मोहीम पाहावयास मिळणार आहेत.
२०२५ वर्ष हे खगोलीय घटनांच्या बाचतीत गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक चांगले आहे. नववर्षांत १३० १४ मार्चला खग्रास चंद्रग्रहण, २९ मार्चला आशिक सूर्यग्रहण, ७ व ८ सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण, तर २१ सप्टेंबरला आशिक सूर्यग्रहण होणार आहेत. अशी ही एकूण ४ ग्रहणे होणार आहे. मात्र, भारतात ७ व ८ सप्टेंबरला एक खग्रास चंद्रग्रहण पाहावयास मिळणार आहे.
हे खग्रास ग्रहण रात्री ९.५७ वाजता सुरु होईल, ग्रहण मध्य ११.४२ आणि मोक्ष १.२० वाजता रात्री होईल. विशेष म्हणजे नवीन वर्षात ४ धुमकेतू दिसतील, यात ३ केवळ जानेवारी महिन्यात १३ व १४ तारखेदरम्यान दिसेल.
तर, दरवर्षीपेक्षा जास्त म्हणजे ४ सुपरमून या वर्षात दिसणार आहेत. १४ मार्च, ७ ऑक्टोबर, ५ नोव्हेंबर आणि ४ डिसेंबरला रात्री पाहता येणार आहेत. यावेळेस चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के प्रकाशमान दिसेल. नववर्षात जवळ जवळ १० चांगले उल्का वर्षाव पाहण्याची संधी आहे
त्यात ३ जानेवारीला क्वाद्रांटीड, २२ एप्रिल लायरीड, में इटा अक्यारीड, ८ ऑक्टोबर ड्राकोनिड, १८ ऑक्टोबर जेमिनिड, २१ ऑक्टोबर ओरीओनिड, २४ ऑक्टोबर लिओनिड, १२ नोव्हेंबर टोरोड, १७ नोव्हेंबर लिओनिड तर २४ डिसेंबर जेमिनिड आणि २२ डिसेंबरला उखिंड उल्कावर्षांव दिसेल.
पौर्णिमा १३ जानेवारी, १२ फेब्रुवारी, १४ मार्च, १२ एप्रिल, १२ मे, ११ जून, १० जुलै, ९ ऑगस्ट, ७ सप्टेंबर, ७ ऑक्टोबर, ५ नोव्हेंबर आणि ४ डिसेंबरला दिसेल, या वर्षाच्या सुरूवातीलाच तसेच वर्षभर बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी ग्रह तसेच दुरेनस आणि नेपचून ग्रह संध्याकाळच्या आणि काही काळ सकाळच्या आकाशात दिसतील.
अनेक महिने आपल्याला या ग्रहांची परेड पाहता येईल. वर्षभर चंद्र आणि इतर ग्रह मंगळ, शुक, गुरु आणि शनी ग्रह यांचे काही पिधान आणि अनेक युती दिसेल. नवीन वर्षात निसार मोहीम, गगनवान १.२ मोहीम आणि शक्य झाल्यास गगनपान ३ मोहीम याच वर्षी पूर्णत्वाला जावू शकेल. १६ जानेवारी मंगळ ग्रह व २१ सप्टेंबर शनी ग्रह पृथ्वी जवळ येणार आहे.