अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- जिल्ह्यत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून याची सर्वाधिक झळ हि जिल्ह्यातील उत्तरेकडीन भागांमध्ये बसलेली आकडेवारीच्या माध्यमातून दिसून येत आहे.
यामध्ये संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी या तालुक्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. यातच गेल्या 24 तासात कोपरगाव शहरासह तालुक्यात 143 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे
तर तालुक्यातील अंचलगाव येथील 65 वर्ष वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
दरम्यान तालुक्यात बुधवार (दि.12 मे) पर्यंत ऐकून 10 हजार 565 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून आठ हजार 306 रुग्ण बरे झाले आहे.
तसेच 1192 सक्रिय पेशंट आहे तर आज पर्यंत ऐकून 43 हजार 81 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्यांची टक्केवारी 24.10 तर मृत्यू चे प्रमाण 1.41 टक्के आहे. आतापर्यंत 158 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.