अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला गती येणार आहे. यासाठी केंद्राने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. या रेल्वेमार्गाच्या कामाला या निधीमुळे गती येणार असल्याची माहिती भाजपच्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करून दिले आहे.
मागील अनेक काळापासून रखडलेल्या या प्रकल्पाला शंभर कोटींच्या निधीनंतर गती येईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. राज्यानेही या रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सामान्यांकडून होत आहे.
हा मार्ग बीड आणि नगर जिल्ह्यासांठी खूप महत्त्वाचा आहे. केंद्राने यापुर्वी या मार्गासाठी 527 कोटींचा निधी मंजूर केला होता.
त्यामधील 100 कोटींचा निधी मिळाल्याने या रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार आहे. मराठवाड्यातील खासकरून बीड जिल्ह्यातील दळणवळणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्या खर्चातील
केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा असलेला 66 कोटी 75 लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने फेब्रुवारीत उपलब्ध करून दिला होता.