दीड वर्षांत बनविल्या १०० पॉर्न मुव्हीज आणि केली कोट्यवधींची कमाई ! जाणून घ्या राज कुंद्राचे कारनामे !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यात आहे.

राज कुंद्रा यांनी दीड वर्षाच्या कालावधीत 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनवल्याची माहिती समोर आली आहे. राज कुंद्रा यांनी ऑगस्ट 2019 मध्ये अश्लील चित्रपट बनवायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनविले आहेत.

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, या चित्रपटांच्या माध्यमातून कुंद्रा यांनी मोठी कमाई केली आहे. ती कमाई कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. कुंद्रा यांच्या अ‍ॅपसाठी सुमारे 20 लाख लोकांनी सदस्यता घेतली होती.

राज कुंद्रानं दीड वर्षांमध्ये १०० पेक्षा अधिक पॉर्न मुव्हीजची निर्मिती केली होती. तसंच याच्या माध्यमातून त्यानं कोट्यवधी रूपयांचीही कमाई केली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रान्चन अंधेरी पश्चिम येथील राज कुंद्राच्या वियान या ऑफिसवर छापा टाकला होता. या ठिकाणी पोलिसांना मोठ्या प्रमाणात डेटा हाती लागला. इतकंच नाही तर काही डेटा डिलीटही करण्यात आला होता.

हा डेटा क्राईम ब्रान्च फॉरेन्सिक एक्स्पर्ट्सच्या मदतीनं रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनुसार अश्लिल चित्रपटांच्या निर्मितीमध्ये राज कुंद्रा ऑगस्ट २०१९ पासून सहभागी होता, तसंच त्यानं आतापर्यंत १०० पेक्षा अधिक पॉर्न फिल्म्सची निर्मिती केली आहे.

क्राईम ब्रान्चशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटांच्या माध्यमातून राज कुंद्रानं कोट्यवधींची कमाई केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे चित्रपट ज्या अॅपवर अपलोड केले जातात त्यांच्याकडे २० लाखांच्या जवळ सबस्क्रायबर्स आहेत. दरम्यान परकी चलन विनिमय कायद्यानुसार कुंद्राच्या विरोधात ईडी गुन्हा दाखल करणार आहे.

याचबरोबर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसारही त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई 26 जुलैनंतर होणार आहे. आर्थिक गुन्ह्यांशी निगडित प्रकरणांचा तपास ईडी करते. त्यामुळे ईडीकडून लवकरच या प्रकरणी कार्यवाही केली जाणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24