Maharashtra News:राज्यातील मदराशांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणासोबतच विज्ञान, गणित, समाजशास्त्र व विविध भाषा विषयांचे शिक्षण देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा अधुनिकीकरण योजना राबविण्यात येते.
पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हणजे ऑक्टोबर २०१३ पासून ही योजना सुरू झाली आहे. यासाठी नोंदणीकृत मदरशांना निधी देण्यात येतो यावर्षी अर्थसंकल्पात मंजूर असलेला ३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास सध्याच्या राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
औरंगाबादमध्ये सर्वाधिक ६६ मदरसे आहेत. नांदेड १२, बीड ८, जालना ७, उस्मानाबाद ४, लातूर ४, वर्धा २, हिंगोली २. अशा १०४ मतदरशांना ही निधी देण्यात आला आहे. मदराशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या निधीचा वापर केला जावा,
या आपेक्षेने सरकारने ही योजना सुरू केली आहे. यातून संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तही देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा निधी देत सध्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पुढे सुरू ठेवण्याचे संकेतच दिले आहेत.