जुगार खेळणाऱ्या ११ जणांना रंगेहात पकडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-  अकोले येथे कॉन्स्टेबल विठ्ठल शरमाळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने गुरुवारी कोतूळ येथे छापा टाकून मटका, जुगार खेळणाऱ्या ११ जणांना रंगेहात पकडले.

सार्वजनिक मुतारीच्या आडोशाला हसन उस्मान अत्तार, रोहिदास भिमा कचरे, सुरेश विष्णू खंडवे, भाऊसाहेब भिमा मधे, पप्पू पिनाजी खंडवे, बारकू बाळू पारधी, संपत दगडू बुरके,

सुधाकर महादू देशमुख, दीपक गुलाब लोखंडे, अकिल अबू अत्तार हे कल्याण मटका खेळताना आढळले. नंदू भगवंता खरात हा पैसे घेऊन मटका आकडे लिहिलेल्या चिठ्ठी देत होता.

२२ हजार २०० रूपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. गुरूवारी दुपारी टाहाकारी येथे घराच्या आडोशाला रामदास महादू जाधव विनापरवाना दारुविक्री करताना आढळला.

निळवंडे येथे आकाश बाळासाहेब अवचिते हाही देशी दारुविक्री करताना आढळला. जाधव याच्याकडून देशी दारूच्या १७ बाटल्या व १ हजार २० रूपये व आकाश बाळासाहेब अवचिते याच्याकडून एकूण १ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, असे सांगण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24