अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे.
त्यामुळे मुळा धरणाकडे सध्या 1158 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या नऊ हजार 391 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू होता. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभ क्षेत्रावरही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
मुळा धरणाची पातळी लक्षात घेता यंदा ऊसाच्या लागवडीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे .मात्र ,कपाशी पिकाच्या क्षेत्रामध्ये घट झाली आहे. यंदा मुळा धरण भरणाऱ्या च्या अंदाजावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ती उसाच्या लागवडी केल्या आहेत.
यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षापासून मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे .मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास जायकवाडी कडे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे मुळा धरणाच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होते.
मुळा नदी काठच्या विहिरीची ही पातळी वाढण्यास मदत होते. मुळा धरणात गेल्यावर्षीचा दोन हजार दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणीसाठा शिल्लक होता.
सध्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू असून सध्या1158 क्युसेसने पाण्याची आवक सुरू आहे असे मुळा धरण शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.