जमिअत उलमाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 12 लाखाचा निधी जमा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- जमिअत उलमाच्या अहमदनगर शहराची कार्यकारणी चे कार्यक्रमाचे आयोजन मुकुंद नगर येथील तमीमदारी मशीद येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये जमिअत उलमाचे जिल्हा अध्यक्ष काझी व मुफती मौलाना ईरशादुल्ला कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या बैठकीत संपूर्ण जिल्हाभरातून पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

जमिअत उलमाच्या शहर अध्यक्षपदी मौलाना शफिक कासमी यांची निवड करून पत्र देण्यात आले तसेच शहर उपाध्यक्ष मुस्ती अल्ताफ व निसार करिम बागवान, जनरल सेक्रेटरी कारी अब्दुल कादिर, सेक्रेटरी मौलाना इसाक कासमी व मौलाना अक्तर,

खजिनदार हाजी इस्माईल यांची निवड घोषित करून पत्र देण्यात आले यावेळी बैठकीत पूरग्रस्तांचे संकट टाळण्यासाठी सर्वांनी सामुदायिक प्रार्थना करून मदत देण्यासाठी हाक देण्यात आली व सर्वांनी प्रतिसाद देत आपापल्या परीने मदत जाहीर करून जमिअत उलमाच्या बैठकीत 12 लाखाची मदत गोळा करण्यात आली ही मदत लवकरात लवकर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाठवण्यात येणार असल्याचे

जमिअत उलमाच्या जिल्हा अध्यक्ष काझी व मुफती मौलाना ईरशादुल्ला कासमी म्हणाले तसेच जमिअत उलमाच्या नूतन शहर अध्यक्ष मौलाना शफिक कासमी यांनी देखील चार लाखाची मदत जाहीर करून म्हणाले की जमिअत उलमा ही संघटना सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असणार

व ज्या ज्या ठिकाणी संकटे येणार त्या ठिकाणी जमिअत उलमाचे पदाधिकारी मदत करणार तसेच या संकटामध्ये ज्यांचे घर पडले व वाहून गेले अशांना घर बांधून देणार व सर्व धर्मियांच्या संकटामध्ये ही संघटना आपले योगदान देणार असल्याचे म्हणाले तसेच मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी देखील संघटना लढा देणार असल्याचे म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24