अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- सध्या राज्यासह तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून श्रीरामपूर तालुक्यात काल नवीन 21 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या पाच दिवसात सुमारे 125 रुग्णांना करोनाची लागण झाली.
तर त्यातील सुमारे 82 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या एकूण अंदाजे 50 ते 55 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा रुग्णालयात 01, खासगी रुग्णालयांमध्ये 15 तर अँटीजन चाचणी तपासणीत 05 असे 21 रुग्ण आढळून आले आहेत.
तर करोनाचे उपचार करुन एकूण 20 रुग्णांना घरी पाठविण्यात आला आहे. शहरासह तालुक्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.
फेब्रुवारीनंतर वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहनही प्रशासनाने वारंवार करत आहे.