ताज्या बातम्या

13-Seater Car In India : Tata, Mahindra नव्हे तर ही कंपनी घेऊन आले 13 सीटर कार; किंमत आहे फक्त…

Published by
Ahmednagarlive24 Office

13-Seater Car In India : देशात वाहन निर्मात्या कंपन्या बाजारात अनेक कार लॉन्च करत आहे. यामध्ये Tata आणि Mahindra अग्रेसर आहे. अशा वेळी ग्राहक बजेटनुसार कार खरेदी करत असतात.

दरम्यान, तुम्ही 5 सीटर, 6 सीटर, 7 सीटर आणि 8 सीटर कार बद्दल खूप ऐकले असेल पण भारतातही 13 सीटर कार आहे हे तुम्हाला माहीत नसेल. ही टाटा किंवा महिंद्राची कार नसून फोर्स मोटर्सची कार आहे.

फोर्स मोटर्सची फोर्स ट्रॅक्स क्रूझर दोन सीटिंग लेआउट्समध्ये सादर करण्यात आली आहे – 10 सीटर (9+D) आणि 13 सीटर (12+D) पर्याय. 10 सीटर व्हेरियंटमध्ये 9 प्रवासी आणि एक ड्रायव्हर आहे तर 13 सीटर व्हेरिएंटमध्ये कार सादर केली आहे.

सीटिंग लेआउट

13 सीटर कॉन्फिगरेशन असलेल्या मॉडेलमध्ये ड्रायव्हर आणि पुढच्या बाजूला प्रवासी सीट आहे. दुसऱ्या रांगेत तीन प्रवासी (बेंच सीट) जागा आहेत. त्याच वेळी, मागील बाजूस समोरासमोर दोन बेंच सीट आहेत, ज्यामध्ये 4 लोक बसू शकतात. म्हणजेच मागच्या बाजूला एकूण 8 लोक बसतात. अशा प्रकारे एकूण 13 लोकांसाठी बसण्याची सोय आहे.

दुसरीकडे, 10-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये, पुढच्या बाजूला ड्रायव्हरसह दोन प्रवासी जागा आहेत. दुसऱ्या रांगेत तीन पॅसेंजर (बेंच सीट) सीट्स आणि मागील बाजूस दोन फ्रंट-टू- बॅंच सीट आहेत ज्यात 4 लोक बसू शकतात. असे एकूण 10 लोक बसू शकतात.

इंजिन आणि किंमत जाणून घ्या

फोर्स ट्रॅक्स क्रूझर 2596CC, BS-VI, 4 सिलेंडर, कॉमन रेल DI TCIC इंजिन (डिझेल) द्वारे समर्थित आहे, जे 67kW@3200rpm आणि 250 Nm@1400-2400rpm पॉवर/टॉर्क आउटपुट तयार करते. यात पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. त्याची किंमत सुमारे 16.08 लाख रुपयांपासून सुरू होते आणि सुमारे 18.00 लाख रुपये (ऑन-रोड, दिल्ली) पर्यंत जाते.

Ahmednagarlive24 Office