ताज्या बातम्या

14 October Petrol – Diesel rate: पेट्रोल डिझेल च्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा दर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :-  देशभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल 34 तर डिझेलच्य प्रतिलीटर दरात 37 पैशांनी वाढ झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर होते. त्यामुळे इंधनाच्या दरवाढीला लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र, आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 110.75 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 101.40 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 114.69 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 104.78 आणि 93.54 रुपये इतका आहे.

हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महानगरांमधील आजचे नवीनतम दर जाणून घ्या :-

-आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 104.79 रुपये आहे. त्याचबरोबर डिझेल 93.52 रुपये प्रति लिटर आहे.

आता कोलकातामध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 105.43 रुपये आहे. त्याचबरोबर डिझेल 96.63 रुपये प्रति लिटर आहे.

आता मुंबईत 1 लीटर पेट्रोलची किंमत 110.75 रुपये आहे. त्याचबरोबर डिझेल 101.40 रुपये प्रति लिटर आहे. आता चेन्नईमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 102.10 रुपये आहे. त्याचबरोबर डिझेल 97.93 रुपये प्रति लिटर आहे.

असे ठरवतात किंमत – परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

अहमदनगर लाईव्ह 24