Home Loan : चुकवू नका ही संधी! देशातील 15 बँका ग्राहकांना स्वस्तात देत आहेत गृहकर्ज, पहा यादी…

Published by
Ahmednagarlive24 Office

Home Loan : भारतीय रिझर्व्ह बँकेने 5 एप्रिल रोजी आपल्या पतधोरण आढावा बैठकीत सलग सातव्यांदा व्याजदर स्थिर ठेवले. यावेळीही रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. असे असले तरी देखील देशातील टॉप 15 बँका सध्या ग्राहकांना कमी दरात गृहकर्ज ऑफर करत आहेत. आज आम्ही तुम्हाला 75 लाख रुपयांपर्यंतच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावर दरमहा तुम्हाला किती EMI भरावा लागेल हे सांगणार आहोत. चला तर मग…

युनियन बँक ऑफ इंडिया

युनियन बँक ऑफ इंडिया सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे. UBI गृहकर्जावर ८.३५ टक्के व्याज आकारत आहे. 75 लाखांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावर मासिक ईएमआय 63,900 रुपये असेल.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक आणि IDBI बँकेकडून गृहकर्ज ८.४ टक्के दराने उपलब्ध आहेत. 75 लाखांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावर मासिक ईएमआय 64,200 रुपये असेल.

कॅनरा बँक

कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाची गृहकर्ज ८.५ टक्के दराने उपलब्ध आहे. 75 लाखांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावर मासिक ईएमआय 64,650 रुपये असेल.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक गृहकर्जावर ८.७ टक्के व्याज आकारत आहे. 75 लाखांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावर मासिक ईएमआय 64,550 रुपये असेल.

ॲक्सिस बँक

खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये ॲक्सिस बँक सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे. 75 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावर मासिक ईएमआय 65,7750 रुपये असेल.

आयसीआयसीआय बँक

ICICI बँक गृहकर्जावर 9 टक्के व्याज आकारत आहे. 75 लाखांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावर मासिक ईएमआय 66,975 रुपये असेल.

एचडीएफसी बँक

भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक HDFC गृहकर्जावर 9.4 टक्के व्याज आकारत आहे. 75 लाखांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावर मासिक ईएमआय 68,850 रुपये असेल.

येस बँक

येस बँक गृहकर्जावर ९.४ टक्के व्याज आकारत आहे. 75 लाखांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावर मासिक ईएमआय 68,850 रुपये असेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्जावर ९.१५ टक्के व्याज आकारत आहे. SBI च्या 75 लाखांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावर मासिक EMI 67,725 रुपये असेल.

Ahmednagarlive24 Office