जुगार अड्ड्यावर छापा टाकून 15 जुगाऱ्यांना घेतले ताब्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- उसाच्या शेतामध्ये एक छोटी झोपडी तयार करून त्यामध्ये सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर जामखेड पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान घटनास्थळाहून १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी १ लाख ६ हजारांची रोकड, एक कार, चार दुचाकी, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे एका उसाच्या शेतात एक छोटी झोपडी बनवून त्यामध्ये पैशांवर तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती जामखेड पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस पथकाने मध्यरात्री एकच्या सुमारास वंजारवाडी येथील उसाच्या शेतात सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर छापा टाकला. व १५ जुगाऱ्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल संदीप मच्छिंद्र आजबे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुगाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :- अजय बबन साठे (रा. रत्नापूर, ता. परांडा) राजेंद्र उद्धव डहाळे (रा. तरडगाव), रामा जानू आव्हाड, महादेव लक्ष्मण शेतकर, संभाजी सीताराम कराड, दादा लक्ष्मण इपार (रा. वंजारवाडी), बाळासाहेब हरिभाऊ साठे (रा. जवळके),

घनश्याम कैलास डोके (रा. खर्डा), हनुमंत उत्तम देवकर (रा. रत्नापूर, ता. परांडा), संदीप भीमा भोसले (रा. वंजारवाडी), हर्षद नजमो शेख, महेश शहाजी काळे (रा. धनेगाव), किरण मुकुंद गोलेकर, प्रकाश रामकृष्ण गोलेकर, योगेश अण्णा सुरवसे (रा. खर्डा) यांना जुगार खेळताना पकडण्यात आले.

Ahmednagarlive24 Office