अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नार शहरासह ग्रावापातळीवर कोरोनाचरे संक्रमणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच कोपरगाव शहरासह तालुक्यात 121 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली
त्यात 101 तर खासगी लॅब मधील 30 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 31 असे 161 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान तालुक्यात 9 एप्रिल पर्यंत पाच हजार 798 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून चार हजार 864 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 917 अॅक्टिव पेशंट आहे. आज पर्यंत 25 हजार 866 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.
कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्यांची संख्या 20.95 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.20 टक्के असे आहे. तर 66 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
दरम्यान सर्व नागरिकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाशी मुकाबला करण्यासाठी नियमाचे पालन करावे. सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळावे, गर्दी करू नये, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच मास्कचा वापर कायम करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.