अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- देवळालीप्रवरा येथील १७ वर्षीय तरुणीने पाच दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

या तरुणीवर राहुरी फॅक्टरी येथे उपचार चालू असताना तिने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. देवळाली प्रवरा शहरातील अमरधाम येथे अत्यंविधी करण्यात आला.

देवळाली प्रवरा येथील पायल सुभाष मुसमाडे (वय १७) हिने पाच दिवसांपूर्वी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

पायलने औषध घेतल्याचे लक्षात येताच घरच्यांनी राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

उपचार सुरू असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24