१७० शिक्षक बनले मुख्याध्यापक, फक्त १४ पदे रिक्त

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  जिल्हा परिषदेत (ZP) सरळसेवेने भरती झालेल्या उपाध्यापकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू होती. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या उपाध्यापकांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती.

त्यावर हरकती घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध करत या पदांवर मंगळवारी पदोन्नती देण्यात आली. जिल्ह्यात १८४ मुख्याध्यापकांची, तर १८ विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यापैकी आता १७० मुख्याध्यापक व १८ पैकी १८ विस्तार अधिकारी पदे भरली गेली आहेत. मुख्याध्यापकांची फक्त १४ पदे रिक्त राहिली आहेत.

पदवीधर शिक्षक, उपाध्यापक यांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिली जाते. तर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांना सेवाज्येष्ठतेनुसार विस्तार अधिकारीपदी पदोन्नती दिली जाते.

अकोले १२, कर्जत ९, कोपरगाव ८ (२), जामखेड १० (१), नगर २१ (१), नेवासा २३ (२), पाथर्डी १० (२), पारनेर ९ (२), राहाता ११, राहुरी १० (२), शेवगाव ९, श्रीगोंदा १४ (१), श्रीरामपूर १३ (२), संगमनेर ११ (१), मुख्यालय (२).