अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील गजानन कॉलनी या भागात राहणार्या १८ वर्षे वयाच्या कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरी अभ्यासाच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 57/2021 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
या घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांनी भेट दिली.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री.संजय काळे हे करीत आहेत. पोलिसांनी या मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाही.