अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहरातील विनोद सर्जेराव मोरे या १९ वर्षीय अविवाहित तरूणाने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी घडली आहे.

विनोद सर्जेराव मोरे हा तरूण राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात आपल्या कुटूंबासह राहत होता. दिनांक १२ ऑगस्ट रोजी सायंकाळ पर्यंत तो घराबाहेर होता. दरम्यान काही मित्रांना भेटला.

पाच वाजे दरम्यान तो त्याच्या राहत्या घरी आला. घरातील सर्वजण पुढच्या खोलीत असताना तो मागच्या घरात गेला. आणि त्याने घरातील छताच्या लोखंडी ॲगलला साडी बांधून गळफास घेतला.

त्याच्या घरातील लोकांनी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिला. तेव्हा तातडीने त्याला खाली उतरवून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

त्याच्या मित्रांनी रूग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. तर घरातील लोकांनी हंबरडा फोडला होता. विनोद याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24