साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी‌ 2 आठवड्यांची डेडलाईन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- येत्या २२ जूनपर्यंत साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला दिले आहेत.

त्यानुसार, आता विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असून अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

सिद्धीविनायक मंदिर शिवसेनेकडे असल्याने पंढरपुर आणि शिर्डी मंदिराच्या अध्यपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये रस्सीखेच सुरू आहे.

अहमदनगर जिल्हयात राष्ट्रवादीचे सर्वाधिक ६ आमदार असल्याने राष्ट्रवादीने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे तर कॉग्रेस देखील अध्यपदाची मागणी करत आहे.

२०१४ साली राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आल्यानंतर साईबाबा संस्थानवर भाजप आणि शिवसेनेच्या निगडीत नेत्यांची वर्णी लागली होती.

संस्थानचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदावर भाजपची वर्णी लागल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २२ जूनपर्यंत शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळ नेमणुकी संदर्भात माहीती देण्याचे आदेश दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून शिर्डी विश्वस्त मंडळ नेमण्या‌ संदर्भात हालचाली गतिमान झाल्या आहेत.

विश्वस्तपदी वर्णी लागावी यासाठी तिनही पक्षाच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना आणि विश्वस्तांना मान मिळत असल्याने विश्वस्त पद पदरी पाडून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24