अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-कायम सामाजिक प्रश्नाची जान असणारे, समाजावर कुठलेही संकट उभे राहिले तर पुढे जाऊन नेतृत्व करणारे नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी शिवबा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर सुरु केलेआहे.
राहुरी फँक्टरी व देवळाली प्रवरा येथील नागरिकांच्या सोयीसाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आल्याचे राज्यमंञी ना.प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी फँक्टरी येथे नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी स्व मालकीच्या इमारतीत 25 बेडचे आँक्सीजन सुविधा असणारे कोविड सेंटर सुरु केले.
त्याच्या शुभारंभ प्रसंगी ना.तनपुरे बोलत होते.यावेळी नगरसेवक अदिनाथ कराळे,रविंद्र कराळे,अजीत वाकचौरे,दिपक ढुस, सुशांत भोसले,
शुभम सोनवणे, संदिप गागरे,सिद्धार्थ कड,सोरभ कड,अजय गिते,बापुसाहेब हिंगे,प्रशांत काळे,रविंद्र हिंगे आदी उपस्थित होते.
शिवबा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कोविड सेंटर डाँ विक्रम खुरुद यांच्या मार्गदर्शनाखाली डाँ.रविंद्र घुगरकर,
डाँ.श्रेयस वारुळे, राजु अंञे, सोनाली पंडीत आदी उपचार करणार आहेत. आँक्सीजन सुविधा असणारे बेड सहजतेने उपलब्ध होत नाहीत.
राहुरी फँक्टरी येथे रुग्णाना उपचार सुविधा मिळणार असल्याने रुग्णांची धावपळ कमी होणार आहे.