ग्रामीण भागात रोजगार हमीच्या कामांवर खर्च झाले 20 कोटी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ग्रामीण भागात रोजगार हमीच्या कामांवर तब्बल 20 कोटींचा खर्च झाला आहे.

यात 1 हजार 482 कामातून 7 हजार 38 हजार मजूरांच्या हाताला काम मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाची स्थिती असतानाही दुसरीकडे रोजगार हमीची कामे सुरु असल्याने अनेक कुटुंबाना आर्थिक आधार लाभला आहे

दरम्यान मागील वर्षी करोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यांत पुण्या-मुंबईसह इतर मोठ्या शहरातील लोक गावाकडे स्थलांतरित झाले.

त्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने ग्रामपंचायतीमार्फत या लोकांना रोजगार हमी योजने अंतर्गत अनेक कामे उपलब्ध करून दिली.

गेल्या आर्थिक वर्षात नगर जिल्ह्यातील 1311 ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमीची विविध कामे सुरू होती. त्यानंतर 31 मार्चनंतर नवीन आर्थिक वर्षाच्या पहिला तीन महिन्यांत 20 कोटींची कामे झालेली आहे.

  • कृषी विभागाच्या 290 कामांवर 1 हजार 878 मजूर
  • सामाजिक वनीकरण विभागाच्या 96 कामांवर 856 मजूर
  • वन विभागाच्या 19 कामांवर 218 मजूर
  • रेशमी विभागाच्या 14 कामावर 88 मजूर
  • अन्य विभागाच्या 2 कामावर 76 मजूरांची उपस्थिती होती.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24