जिल्हा परीषद शाळेत 20 हजारांचे साहित्य चोरी, शाळेच्या मैदानावर तळीरामांचा उच्छाद!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सहा वर्ग खोल्यांचे दगडाच्या साह्याने दरवाजे तोडून सहा खोल्यातील इलेक्ट्रिक फँन व खुर्च्यासह इतर साहित्य असे 20 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला.

लाँकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने शाळेच्या मैदानावर तळीरामांनी उच्छाद मांडला आहे.मैदानावर दारुच्या रिकाम्या व फोडलेल्या अवस्थेतील बाटल्यांचा खच पडला आहे.मैदानात कोठेही पाहिले तर दारुच्या बाटल्याच दिसतात.

या तळीरामांकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. विद्येचे माहेरघर बनला दारु अड्डा.ज्या जागेत विद्या आत्मसात केली त्याच ठिकाणी तळीराम आज बाटल्या रिचवत आहे.

देवळाली प्रवरा ता.राहुरी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत गुरुवारी मध्यराञी ते शुक्रवारी पहाट पर्यंत अज्ञात चोरट्याने शाळेच्या वर्ग खोल्यांच्या दरवाजावर मोठ मोठे दगड टाकून दरवाजे तोडून वर्गातील सिलिंग फँन व इलेक्ट्रिक वस्तू, खुर्च्या इतर साहित्य असे एकुण 20 हजार रुपयाच्या वस्तू अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या. वर्ग खोल्यातील इतर साहित्याची नासधुस मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

दरवाजे दगडाच्या साह्याने तोडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना एका पञकाराने चोरीची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ पो.हे.काँ.संजय पठारे यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले.

परंतू पठारे घटनास्थळी न येता पो.काँ.गणेश फाटक यांना पाठवून फिर्याद देण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. देवळाली प्रवरात दुरश्रेञ असून अडचन नसून खोळंबा अशी अवस्था सध्या आहे.

अवघे दोन पोलीस कर्मचारी या पोलीस चौकीत येत असतात सध्या त्यांना हि राहुरी पोलीस ठाण्यात ड्युट्या असल्याने संध्याकाळी येऊन तासभर पोलीस चौकीवर थांबताना दिसत आहे. जिल्हा परीषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल पठारे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात जावून दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लाँकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने शाळेच्या मैदानावर तळीरामांनी उच्छाद मांडला आहे.मैदानावर दारुच्या रिकाम्या व फोडलेल्या अवस्थेतील बाटल्यांचा खच पडला आहे.मैदानात कोठेही पाहिले तर दारुच्या बाटल्याच दिसतात.या तळीरामांकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. विद्येचे माहेरघर बनला दारु अड्डा.ज्या जागेत विद्या आत्मसात केली जात आहे.

त्याच जागेत तळीराम आज बाटल्या रिचवत आहे. पोलीसांची गस्त नसल्यामुळे तळीरामांचे फावत आहे.सायंकाळी तळीरामांची शाळेच्या मैदानावर जञा भरते आहे.वेळीच बंदोबस्त न झाल्यास तळीराम दिवसा ढवळ्या दारुचा अड्डा बनवतील. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणार आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24