अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटलेल्या जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतींकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीचे कर्ज थकीत आहे. यात 93 लाखांची मुद्दल, तर 39 लाखांच्या व्याजाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे हे कर्ज 10 वर्षे ते 26 वर्षांपासून थकीत आहे. या 21 ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेने 1 कोटी 35 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज ग्रामपंचायत कार्यालय, अंतर्गत रस्ते बांधणी, शॉपिंग सेंटर, टॅक्टर खरेदी करणे,
नळ पाणी योजना, शाळा खोल्या, मंगल कार्यालय, शौचालय बांधण्यासाठी दिलेले आहे. दिलेल्या कर्जाची परत फेडसंबंधीत ग्रामपंचायतीने 10 हप्त्यात 10 वर्षात परतफेड करणे आवश्यक आहे.
यात आधी व्याजाची वसूल करण्यात येत असून त्यानंतर मुद्दलीची वसूली करण्यात येते. मात्र यात काही ग्रामपंचायतींनी कर्ज घेतल्यापासून आतापर्यंत एक कवडीही भरलेली नाही.
काही ग्रामपंचायतींना कर्ज फडण्यासाठी काही वर्षाचा कालवधी आहे. मात्र, 10 वर्षे उलटल्यानंतरही थकबाकी असणार्या ग्रामपंचायतींवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.